नुकताच पोलिस बॉईज संघटना यांच्या वतीने महाराष्ट्रात २६/११ च्या हल्ल्यामध्ये पोलिसांकडे अत्याधुनिक शस्र नसतानासुद्धा खूप हिमतीने आपल्या जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण केले.त्यांच्या बलिदानाची आठवण कायम रहावी व पोलीस कर्मचार्यांनाचा जनतेने कायम सन्मान करावा या उद्देशाने राज्यभर श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पोलिसांचा व त्यांच्या परिवाराचा जीव वाचवा अशी मागणी गृहमंत्री
दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र पोलीस अधिकारी कर्मचारी व परिवार यांचा अपघात,हृदय विकार,कॅन्सर व इतर गंभीर आजार याचा उपचार करण्या साठी पोलीस व पोलीस परिवार यांच्याकडे पैसे नसतात, म्हणून जीव गमवावा लागतो.mpky खूप हॉस्पिटल घेत नाहीत. कर्तव्यावर असताना अपघाताचे प्रमाण मोठेआहे,त्यात त्यांचा पाय,हात, किंवा शारीरिक अवयव निकामी होतात किंवा जीवन भर अपंगत्व येते. त्यांच्या परिवारातील वडील,आई,पत्नी,मुलगा,मुलगी यांना हृदय विकार,कॅन्सर किंवा गंभीर आजार जडतात त्यांच्या उपचारासाठी त्या पोलीस कर्मचाऱ्यांकडे पैसे नसतात म्हणून त्याला लोकांकडे मदत मागावी लागते ती मदत काही मिळत नाही अनेकदा पैसे नसल्या मुळे, उपचार न मिळाल्या मूळे जीव गमवावा लागतो असे कित्येक उदाहरण आहेत आणि या अगोदर कित्तेक पोलीस अधिकारी,कर्मचारी व त्यांच्या परिवाराचा जीव गेला आहे अश्या महत्वाच्या राज्याचे संरक्षण करणाऱ्या पोलीस व परिवार यांचा जीव पैसे नसल्या कारणाने जात कामा नये, म्हणून त्वरित उपाययोजना कराव्या.
पोलीस कुटुंब आरोग्य योजने मध्ये पण गंभीर आजार चा समावेश नाही. महाराष्ट्रातील कित्येक हॉस्पिटल यांनी पोलीस कुटुंब आरोग्य योजने मध्ये पोलीसांना व परिवाराला भरती करून घेतले जात नाहीत .माझी हात जोडून विंनती आहे की, शासनाने त्वरित तरतूद करून पोलीस आरोग्य योजनेत रक्कम किंवा पोलीस परिवार महामंडळ केंद्राने जसे मिल्ट्री साठी स्थापन केले आहे त्या धर्तीवर पोलीस महामंडळ स्थापन करावे. व महाराष्ट्रातील तमाम पोलीस अधिकारी कर्मचारी व परिवार यांचा जीव वाचवावा असे ते म्हणाले.
पोलिस आयुक्तालयाची नवी वेबसाईट पोलिसांत तक्रार नोंदविण्यासोबत इतरही सुविधा
या संदर्भात विनंती प्रस्ताव त्यांनी वारंवार शासनाला, मा.राज्यपाल गृहमंत्री केंद्र आणि राज्य यांना राहुल अर्जुनराव दूबाले महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून दिला आहे .त्याचा त्वरित विचार व्हावा जेणे करून असंख्य पोलीस अधिकारी कर्मचारी आणि पोलीस परिवार यांचा जीव वाचेल अशी विनंती राहुल अर्जुनराव दूबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांनी केली
More Stories
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथील विद्यार्थ्यांच्या कृषि संशोधन केंद्रांना भेटी
बार्शी नगरपरीषद पथविक्रेता समिती निवडणूक बिनविरोध, आमदार राजेंद्र राऊत यांनी दिल्या शुभेच्छा