Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > वन्यप्राण्यांपासून शेती, व्यक्ति, पशुधनाचे नुकसान झाल्यास मिळते नुकसान भरपाई

वन्यप्राण्यांपासून शेती, व्यक्ति, पशुधनाचे नुकसान झाल्यास मिळते नुकसान भरपाई

मित्राला शेअर करा

शेतकऱ्यांना ओला दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट,अवकाळी पाऊस, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, बाजार भावातील चढ उतार अशा असंख्य अडचणी सोबत परिणाम होत असतो. त्याच बरोबर अलीकडील काळात वन्यप्राण्यांचा वावर मानवी वस्तीमध्ये वाढू लागला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्यांना स्वतःला कुटुंबाला पाळीव जनावरांना त्रास सोसावा लागतो प्रसंगी प्राण सुद्धा गमवावे लागतात तसेच पिके, फळझाडांचे सुद्धा मोठया प्रमाणात नुकसान होते अश्या परिस्थितीत वन्य प्राण्यापासून होणाऱ्या हानीमुळे शेतकऱ्यांना शासनामार्फत आर्थिक मदत दिली जाते. ही मदत मिळवण्यासाठी वेळेत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.

राज्यातील रानडुक्कर, हरिण , ( सारंग व कुरंग ) ,रानगवा,निलगाय, माकड , वानर तसेच वन्यहत्ती या वन्यप्राण्यांपासून मनुष्य, पशुधन, शेतपिकाला किंवा फळबागांना नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली.


योजनेच्या प्रमुख अटी

  1. पीक नुकसानीची तक्रार नजीकचे वनरक्षक , वनपाल अगर वनपरिक्षेत्राधिकारी यांचेकडे घटना घडल्यापासून तीन दिवसांत करावी .
  2. पीक नुकसानीबाबतची शहानिशा संबंधित वनपाल, संरपंच , व ग्रामसेवक / तलाठी या तीन सदस्यांच्या समितीमाफर्त 10 दिवसांच्या आत करावी.

वन्यप्राणी हल्ल्यामुळे पशुधनाचा मृत/अपंग/जखमी झाल्यास अर्थसहाय्य देण्यासाठी असलेल्या अटी व शर्ती.

▪︎याबाबत संबंधितांनी घटना घडल्यानंतर जनावराच्या मालकाने ४८ तासाच्या आत जवळील वन विभागास खबर देणे आवश्यक आहे.

▪︎मृत जनावराचे शव पंचनामा होई पर्यन्त हलवू नये .ज्या ठिकाणी जनावराचा मृत्यू झाला, त्या ठिकाणापासून १० कि .मी. भागात कोणत्याही वन्य प्राण्याचा ६ दिवसापर्यंत विष देऊन मृत्यू झालेला नसावा.  

▪︎आवश्यक कागदपत्रे : pdf स्वरुपात
पीक नुकसान झालेल्या क्षेत्राचा पंचनामा, मोजणी व नुकसानीबाबतच्या पुराव्याची कागदपत्रे.

लाभाचे स्वरूप
▪︎शासन निर्णयानुसार वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येते .
▪︎या ठिकाणी संपर्क साधावा : संबंधित क्षेत्रातील उपवनसंरक्षक उप विभागीय अधिकारी / वन क्षेत्रपाल यांचे कार्यालय


अर्ज करण्यासाठी वेबसाईट

http://bit.ly/3scffLd

अधिक माहितीसाठी वनखात्याच्या अधिकृत वेबसाईट पहावी.

या वेबसाइटवर वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरिता नुकसान भरपाई मंजुर करणे या ठिकाणी क्लिक करून पुढील प्रक्रिया करायची आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे; काय आहे किसान क्रेडिट कार्ड-कसे मिळवाल कार्ड

सर्व माहिती भरल्यानंतर शेवटी प्रिंट या बटणावर क्लिक करून या अर्जाची प्रिंट काढा.

त्यानंतर हा अर्ज वनविभागाकडे सबमिट होतो. वनविभागातील वनपाल किंवा वनरक्षक हे तुमच्याकडे नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी येतात. त्यावेळी सांगितल्याप्रमाणे कागदपत्रं जवळ ठेवावी लागतात.

तुमच्या अर्जाचं स्टेटस पाहूशकता

आपल्या ऑनलाईन अर्जाचं स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला MAHARASHTRA FOREST PORTAL या पेजवरील Public Services या रकान्यातील RTS Application Tracker या पर्यायावर क्लिक करा.