Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > केंद्राचे नवीन विधेयक, कसे कराल मतदान कार्ड आधारशी लिंक

केंद्राचे नवीन विधेयक, कसे कराल मतदान कार्ड आधारशी लिंक

मित्राला शेअर करा

बोगस मतदान आणि मतदार यादीत डबल नाव येणे किंवा बोगस मतदार नोंदणी रोखण्यासाठी मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठीचे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे

यामुळे लोकप्रतिनिधी कायदा, 1950 आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मध्ये बदल करण्यात येणार आहेत याचबरोबर मतदार यादीही आधारशी लिंक करण्यात येणार आहे

मात्र आणखी अनेकांना Voter ID Card आधार कार्डशी लिंक कसे करायचे हे माहिती नाही, तर ते जाणून घेऊ adhar card link with voter id

असे करता येईल लिंक

▪︎सर्वप्रथम
voterportal.eci.gov.in/

ही लिंक ओपन करा, त्यांनतर आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी किंवा व्होटर आयडी कार्ड नंबर टाका नंतर पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा

▪︎ यांनतर आपले नाव, पत्ता, वडिलांचे नाव, राज्य, जिल्हा ही माहिती भरा , सर्च बटनवर क्लिक करा – त्यांनतर Feed Aadhaar No या ऑप्शनवर क्लिक करा

▪︎आता एक पॉप-अप पेज समोर येईल तिथे आधार कार्डवरील नाव, आधार नंबर, व्होटर आयडी नंबर, रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाका – नंतर Submit बटनवर क्लिक करा

▪︎ त्यानंतर अर्ज रजिस्टर्ड झाल्याचा मेसेज आपल्याला येईल

SMS द्वारे – मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी < व्होटर आयडी कार्ड नंबर >< आधार कार्ड नंबर > या फॉर्मेटमध्ये 166 किंवा 51969 या नंबरवर SMS करून देखील आधार लिंक करता येईल

केंद्राचा हा निर्णय नागरीकांसाठी नक्कीच खूप महत्वाचा आहे ज्या मुळे बोगस मतदार नावनोंदणीवर चाप बसणार आहे.