आरोग्य विभागासह टीईटी परीक्षेच्या पेपरफूट घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार डॉ. प्रीतीश देशमुख याला पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर वर्ध्यातही त्याच्या संपत्तीबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.आलिशान राहणीमान असणाऱ्या प्रीतीशला आमदार व्हायची इच्छा होती.
अल्पावधीत मिळवली करोडोंची संपत्ती
त्याने मागील दोन वर्षांत त्याच्या स्नेहलनगर परिसरातील निवासस्थानालगतच १ कोटी ३० लाख रुपयांची ८ हजार स्क्वेअर फूट जागा आणि दीड कोटी रुपयांची मर्सिडीज बेन्झ ही आलिशान कार खरेदी केल्याची माहिती आता पुढे आली आहे. त्यामुळे प्रीतीशची स्थावर मालमत्ता आहे तरी किती, अशी चर्चा शहरात रंगू लागली असून, पुणे पोलिसांनी ही बाजूदेखील तपासण्याची गरज निर्माण झाली आहे संबंधित लोकांनाही प्रश्न पडायचा एवढ्या अल्प काळात त्याने एवढी संपत्ती कशी जमवली.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनी सुरू केली आणि त्यातूनच कोट्यवधींची माया जमविणे सुरू केले. पेपरफूट प्रकरण पुढे आल्यानंतर त्याच्या संपत्ती समोर येत आहे. त्याच्याजवळ पाच ते सात आलिशान गाड्या असून, त्याने दोन गाड्यांचा व्हीआयपी क्रमांक मिळविण्यासाठी आरटीओत दीड ते दोन लाख रुपये मोजल्याचे आता उघड झाले आहे. त्याने आणखी कुठे मालमत्ता खरेदी केली याचा शोध घेण्याची गरज आहे.
आमदार व्हायची इच्छा
विविध राजकीय नेत्यांना भेटायचा प्रीतीश शहरासह जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांतील नेत्यांना प्रीतीश मुंबईसह नागपुरातील राजकीय पक्षांच्या कार्यालयात भेटत होता. मोठ्या नेत्यांशी ओळख असल्याने त्यांच्याबाबत तो एकेरी भाषेतच बोलायचा. पेपरफूट प्रकरण पुढे आल्याने जिल्ह्यातील अनेक नेतेमंडळी हाच तो प्रीतीश जो राजकीय पक्षांच्या कार्यालयात भेटायचा असे सांगत आहेत.
प्रीतीशने वैद्यकीय शिक्षण नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले व तो हॉस्टेलला न राहता बाहेर आलिशान हॉटेलमध्ये राहत होता, अशी माहितीही पुढे येऊ लागली आहे.
More Stories
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान