बार्शी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भिम टायगर संघटनेच्यावतीने रमाई चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भगवंत स्टेडियम या ठिकाणी करण्यात आले आहे.
या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक विजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, नवनाथ चांदणे, संदेश काकडे, संतोष बारंगुळे विलास रेणकेसुधीर बारबोले, भिम टायगरचे शंकर वाघमारे, दया कदम, दादासाहेब गायकवाड, सुनील अवघडे, राजेंद्र कदम, विजय कदम, राहुल बोकेफोडे, दीपक ओहोळ, भारत तातेड, संदीप आलाट तसेच क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
पहिल्याच सामन्यात बार्शीच्या एस. एम. एम. क्रिकेट क्लबने धानोरे संघाचा ९ गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. या स्पर्धेसाठी बार्शीसह पुणे, सोलापूर कोल्हापूर, औरंगाबाद, बीड लातूर, उस्मानाबाद , तुळजापूर येथील क्रिकेट संघ दाखल झाले आहेत .
More Stories
दत्त प्राथमिक शाळेस उपक्रमशील शाळा पुरस्कार
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 च्या कामांचा आढावा
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत महाविद्यालयांचा उर्त्स्फुत प्रतिसाद