अखिल भारतीय सीताफळ महासंघ व लायन्स क्लब बार्शी टाऊन, यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जन्म दिनानिमित्त व 1 जुलै हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो
या कृषी दिनाचे औचित्य साधून सीताफळ उत्पादन तंत्रज्ञान या विषयक प्रशिक्षण व प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजन शुक्रवार दिनांक 1 जुलै 2022 रोजी मधुबन फार्म अँड नर्सरी, बार्शी परंडा बायपास चौक, बार्शी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमांमध्ये सिताफळ जातीची निवड पूर्वमशागत झाडांची लागवड कशी करावी. झाडांची छाटणी कशी करावी तसेच बहार येण्यासाठी ट्रीटमेंट कशी करावी. बहार आल्यानंतर पीक संरक्षणासाठी विविध उपाययोजना कशा कराव्यात. एकात्मिक अन्नद्रव्य नियंत्रण कसे करावे. विक्री व्यवस्थापन सीताफळ प्रक्रिया उद्योग यांसारख्या विविध बाबींवर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन शेतकरी बांधवांना ऐन.ऐम.के 1 गोल्डन चे निर्माते डाॅ. नवनाथ कसपटे हे मोफत देणार आहेत. सदर प्रशिक्षण संपूर्णपणे मोफत असून ज्या शेतकरी बांधवांना प्रशिक्षण कार्यक्रम मध्ये सहभाग घ्यावयाचा आहे. त्यांनी नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे नावनोंदणी करीता संपर्क, 9881426974 / 9923137757 सदर कार्यक्रमाचा जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा.
तसेच कृषी सन्मान सोहळा २०२२-२३ यासाठी बार्शी तालुक्यातील शेती व शेती पूरक व्यवसाय चांगेल उत्पन्न झाले आहे. त्यांनी आपले कार्य व माहिती मो.न. ९८२२८८६८६२ राजलक्ष्मी बोअर वेल भवानी पेठ बस स्टँड जवळ बार्शी. येथे आपली माहिती जमा करावी. असे आव्हान अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे प्रबंधक प्रवीणजी कसपटे व लायन्स क्लब बार्शी टाऊन यांनी केले आहे.
More Stories
रात्री 9:58 वाजता ISRO चीआणखी एक गगनभरारी!
डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त कर्मवीर बुद्धिबळ स्पर्धा संपन्न
‘सीसीएमपी’ उत्तीर्ण होमिओपॅथी व्यावसायिकांस ॲलोपॅथी व्यवसाय करण्यास परवानगी