बार्शी:- एसएससी बोर्ड परीक्षेत मुलींची शाळा म्हणून नावलौकिक असलेली जिजामाता कन्या प्रशाला बार्शी, गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ यशवंतराव चव्हाण सभागृह येथे संपन्न झाला श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री पी. टी. पाटील सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. सौ. मीनाताई पाटील मॅडम या होत्या तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्राचार्य डी. एम. मोहिते सर व श्री. भालके सर यांची उपस्थिती होती. त्याच प्रमाणे प्रशासन अधिकारी बार्शी नगरपालिका श्री. बनसोडे साहेब व पर्यवेक्षक या नगरपालिका श्री. संजय पाटील सर हेही उपस्थित होते.
विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत असताना सेक्रेटरी पी. टी. पाटील सर यांनी मन, मेंदू आणि मनगट कणखर करून येणाऱ्या संकटाना तोंड देत ध्येय ठरवून यशोशिखर सर करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी असे मत व्यक्त केले त्याच प्रमाणे प्रशासन अधिकारी बनसोडे यांनी मुलींच्या शालेय शिस्तीचे कौतुक केले आणि मुली आज कोणताही क्षेत्रात कमी नाहीत त्यांनी उत्तुंग भरारी सतत घेत राहावी अशी आशा व्यक्त केली त्याचप्रमाणे पर्यवेक्षक श्री संजय पाटील सर यांनी मनोगतात सांगितले की मुली या दोन्ही घरांच नाव उज्वल करीत असतात. म्हणून मुलींच्या माता पालकांनी ही मुलीकडे लक्ष दिले पाहिजे.
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ मीनाताई पाटील मुलींना मार्गदर्शन करत असताना म्हणाल्या की, मुलींनी बौद्धिक क्षमते बरोबरच इतरही कलागुणांना वाव दिला पाहिजे प्रशालेच्या या यशा बद्दल संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. पी. टी पाटील सर, श्री. बनसोडे साहेब, संजय पाटील सर, प्राचार्य मोहिते सर, श्री भालके सर, डॉ. मीनाक्षीताई पाटील मॅडम, मुख्याध्यापिका श्रीम. धावणे मॅडम या सर्वांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. धावणे मॅडम म्हणाल्या की प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अनेक अडथळ्यांवर मात करत आमच्या विद्यार्थिनी ध्येय गाठत असतात. प्रशालेतील विद्यार्थीनी नेहमी अभ्यासात व खेळात अग्रेसर असतात यावर्षी प्रशालेचा निकाल हा ९७% लागला आहे. याचे पूर्ण श्रेय हे आमच्या प्रशालेतील शिक्षकांना जाते असे त्या म्हणाल्या. प्रथम विद्यार्थिनींचा सत्कार रोख रक्कम रोप व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला
प्रथम क्रमांक कु. गव्हाणे ईश्वरी जितेंद्र ९५.२०%
द्वितीय क्रमांक कु. गावकरे वैष्णवी बापूसाहेब ९४.६०%
तृतीय क्रमांक कु. ढगे कोमल राजेंद्र ९२.४०%
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. क्षीरसागर मॅडम, श्रीम. खैरनार मॅडम यांनी केले तर आभार श्रीम. पाटील मॅडम यानी मानले यावेळी प्रशालेच्या शिक्षिका श्रीम. बोधले मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी पालक गुणवंत विद्यार्थ्यांची उपस्थिती होती
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर