Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > बार्शी उपसा सिंचन योजनेस सुधारीत अंदाज पत्रकात 20 कोटी रूपयांची निधी मंजूर – आमदार राजेंद्र राऊत

बार्शी उपसा सिंचन योजनेस सुधारीत अंदाज पत्रकात 20 कोटी रूपयांची निधी मंजूर – आमदार राजेंद्र राऊत

बार्शी उपसा सिंचन योजनेस सुधारीत अंदाज पत्रकात 20 कोटी रूपयांची निधी मंजूर - आमदार राजेंद्र राऊत
मित्राला शेअर करा

बार्शी तालुक्यास वरदान ठरणारी बार्शी उपसा सिंचन योजनेचे काम निधी अभावी रखडलेले होते. सदर योजनेची पंप हाऊस, मुख्य पाईप लाईन व 20 कि.मी. पर्यंतची कामे पूर्ण झालेली असून उपकालवे व पोट चाऱ्यांची कामे शिल्लक आहेत.

त्यामुळे योजनेचा लाभ होणारी गावे पाण्यापासून वंचित राहत आहेत. योजनेची सध्याची एकूण किंमत 650 कोटी इतकी असून त्यावर 200 कोटी इतका निधी खर्च झालेला आहे. उर्वरीत शिल्लक कामांसाठी जवळपास 450 कोटी इतका निधीची आवश्यकता आहे. योजनेची मंजुर अंदाजपत्रका इतका खर्च झालेला असल्याने योजनेवर खर्च करण्यास परवानगी नसल्याने कामे ठप्प झालेली आहेत. सदर योजनेचे सुधारीत अंदाजपत्रक मंजुर झाल्याशिवाय ही कामे सुरु करता येणार नसल्याने, योजनेच्या सुधारीत अंदाज पत्रकास शासनाकडून मंजुरी प्राप्त करुन घेण्यासाठी आ. राजेंद्र राऊत यांच्याकडून शासन दरबारी सतत पत्र व्यवहार करून, वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत होता. त्या पाठपुराव्यास यश येऊन शासनाने या योजनेच्या सुधारीत अंदाज पत्रकास मंजुरी दिलेली आहे.

त्यामुळे उर्वरीत कामे पुर्ण होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. या योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास मंजुरी मिळाल्याने उर्वरीत कामे लवकरच पूर्ण होऊन बार्शी व माढा तालुक्यातील 15000 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येऊन सुजलाम-सुफलाम होणार आहे. यावर्षी योजनेस 20 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली असून, उर्वरीत वाढीव निधीसाठी सतत पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.