वैराग, ता बार्शी : सर्व शासकीय कार्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची धामधूम सुरू असताना बार्शी तालुक्यातील वैराग येथील संतनाथ नगरमधील नागरिकांनी लोकसेवक अधिकारी वर्गाच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त होऊन १४ ऑगस्ट पासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

१५ ऑगस्ट २०२२ हा राष्ट्रीय सण असल्यामुळे तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. याच काळात नागरिकांचे आमरण उपोषण हा चर्चेचा विषय झाला आहे.
संतनाथ नगरमधील सन १९८४ पासून रहिवाशी असलेल्या तसेच महाराष्ट्र शासनाची सन २०१५ पासून वैराग करिता प्रादेशीक योजना मंजूर शिवाय मा. उच्च न्यायालयाचे स्थगीती आदेश व मा. जिल्हाधिकारी , सोलापूर यांचे निर्देश असताना महसूल विभागातील तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार, अधिकारी आणि सब रजिस्टार, वैराग यांनी केलेल्या कसुरी प्रकरणी त्यांचे विरुध्द प्रशासकीय कारवाई करणेत यावी तसेच जमीन गट नंबर ३८८ / २ / २ ड हा तात्काळ दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवात संतनाथ नगर मधील रहिवाशांनी न्याय हक्कासाठी मंडळ अधिकारी , कार्यालय वैराग येथे सामुहीक आमरण उपोषणाचा इशारा दिला आला आहे.
लेखी निवेदनाद्वारे हा उपोषणाचा इशारा देण्यात आला असून या निवेदनात दिनांक १४/०८/२०२२ रोजी पासुन संतनाथ नगरमधील हे रहिवासी आपल्या मागण्यांकरीता आमरण उपोषण करणार असलेचे नमुद केलेले आहे.
दिनांक १५ ऑगस्ट २०२२ हा राष्ट्रीय सण असल्यामुळे तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने आता पुढे काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
More Stories
छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते सोलापूर येथे स्पेन्का ग्रुपच्या भव्य कॉर्पोरेट कार्यालयाच उद्घाटन
वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांना राज्यस्तरीय नेचर केअर पुरस्कार
भैरवनाथ विद्यालयातील श्री.संतोषकुमार चिकणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त