बार्शी-दिनांक २४ डिसेंबर रोजी एम आय टी व्हिजिएस प्रशालेच्या भव्य प्रांगणात फन फेअर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास बार्शी नगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी मा. अनिल बनसोडे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. तसेच मा. डॉ. सुनील विभुते व मा. राहुल झालटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशालेच्या प्राचार्या माननीय रेखा दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आखण्यात आला होता.
कार्यक्रमामध्ये MIT Got Talent Hunt स्पर्धा होती. यामध्ये चित्रकला, गायन, नृत्य या विविध कलांचे प्रदर्शन दाखवण्यात आले. गोंधळ, शेतकरी गीत, नाटकं यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या सर्वांमध्ये पोल मल्लखांब आणि रोप मल्लखांब प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.
अतिथींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना त्यांच्यातील सुप्त कलागुणांना जोपासण्यास सांगितले. या दिमाखदार सोहळ्याची सांगता पसायदानाने झाली.
More Stories
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तृत्तीयपंथी देवांशी काकडेच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन
महाराष्ट्र विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न
जिजाऊ गुरुकुल खांडवीला राज्यस्तरीय The Best School Award