DRDO पुणे येथील जॉईन्ट डायरेक्टर या उच्च पदावर कार्यरत असलेले अक्कोलकोट चे सुपुत्र श्री भिमाशंकर गुरव ( Scientist F. ) यांची ” यंग सायंटिस्ट ऑफ दि ईयर ” साठी निवड झाली आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या शुभहस्ते दिल्ली येथे सत्कार करण्यात आला.
अक्कोलकोट चे सुपुञ भिमाशंकर गुरव यांचा सत्कार डॉ.डी.एस.कोठारी ऑडिटॉरियम डिआरडीओ मुख्यालय डिआरडीओ भवन नवि दिल्ली येथे दिनांक 4/10/21 रोजी सकाळी 11 वाजता पार पडला असून सदर पुरस्कार हा मा. संरक्षणमंत्री श्री राजनाथसिंह यांचे शुभ हस्ते देण्यात आला.
सदर कार्यक्रमास मिल्ट्रीतील उच्च पदस्थ अधिकारी हजर होते. श्री सदर पुरस्कार प्राप्तकर्ते श्री भिमाशंकर गुरव हे अक्कलकोट चे सुपुत्र असून सोलापूर जिल्ह्याचे भूषण आहेत. DRDO पुणे येथील जॉईन्ट डायरेक्टर या उच्च पदावर कार्यरत असलेले अक्कोलकोट चे सुपुञ भिमाशंकर गुरव.(Scientist F.) यांची ” यंग सायंटिस्ट ऑफ दि ईयर “ या मानाच्या पुरस्कारा करिता भारत सरकारने निवड केली आहे.या पूर्वी सुध्दा त्यांना भारत सरकारने अनेकदा त्यांच्या उत्कृष्ट कार्या बद्दल पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.भविष्यातील संरक्षण तंत्रज्ञानामध्ये R & D ची मोठी गरज आहे.
कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आपल्या सैन्याला अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज करणे हे आमचे ध्येय आहे. DRDO आणि शैक्षणिक क्षेत्रामधील संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला आहे अणि नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहे
असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
दीपस्तंभ नाटकामुळे नावलौकिक मिळाला आणि मी घडलो- डॉ गिरीश ओक