के एन भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, विद्यानगर भोसरे या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्य प्रसिद्धी सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
दिनांक २४ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस म्हणून प्राचार्य डॉ.आर.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाने साजरा करण्यात आला.तसेच यानिमित्ताने राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा,वृक्षारोपण, श्रमदान,रक्तदान शिबिर,राष्ट्रीय स्तरावरील गांधी विचारांची एकविसाव्या शतकामध्ये प्रासंगिकता या विषयावरील वेबिनार आयोजित करण्यात आला. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त भित्तीचित्राचे उद्घाटन मा.प्राचार्यांच्या हस्ते करून हा राष्ट्रीय सेवा योजना कार्य प्रसिद्धी सप्ताह साजरा करण्यात आला. २ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ.अतुल कदम,आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा.डाॅ.सचिन लोंढे.लेफ्टनंट प्रा. डॉ. महादेव थोरात तसेच सर्व प्राध्यापक, स्वयंसेवक छात्र,शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
More Stories
बॅडमिंटन स्पर्धेत बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शीचा संघ प्रथम
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान