तेर गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर दसऱ्यापर्यंत मदत जमा न केल्यास शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सरकार विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागांची पाहणी दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलतान सांगितले.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून उस्मानाबाद तालुक्यातील तेरसह परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सोमवारी आले होते.शेतकरी मरणासन्न अवस्थेत असताना त्यात राजकारण पाहणे हे योग्य नाही असे ते म्हणाले.तेर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आमच्या काळात मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याला आठशे कोटीचा विमा मिळाला होता,परंतु गत वर्षी संपूर्ण महाराष्ट्राला सातशे कोटीचा विमा मिळालेला आहे.गेल्यावर्षीचे अनुदान आणि विमा या वर्षीचे अनुदान मिळाले नाही.शेतकऱ्याची आज फार मोठी वाईट अवस्था झाली आहे.त्यामुळे सरकारने दसऱ्यापर्यत शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट तातडीने मदत जमा करावी अन्यथा शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशाराच त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
गेल्या चार दिवसापासून आपण मराठवाड्याचा दौरा करीत आहोत.अत्यंत वाईट अवस्था शेतकऱ्यांसह शेतीची झाली आहे. सोयाबीन जागेवरच कुजले आहे.तूर,कापूस,ऊस याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना शेत दुरुस्ती करण्यासाठी पाच ते सहा हजार रुपये लागतात,परंतु शेत दुरुस्ती करण्यासाठी ही शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीने दहावी फेल विमा प्रतिनिधी नियुक्त केले आहेत असे सांगून देवेंद्र फडवणीस यांनी ज्यांना शेतातील काही कळत नाही हे लोक पंचनामे करत आहेत तसेच विमा कंपनीने नेमलेले प्रतिनिधी नुकसान दाखवण्यासाठी शेतकऱ्याकडून पैसे घेतले जात असल्याचे ते म्हणाले.
फडणवीस याना पिंपळाच्या पानावर बनवलेली कलाकृती सदिच्छा भेट दिली या प्रसंगी बार्शीतील चित्रकार महेश मस्के बबलू नाईकवाडी बबलू नाईकवाडी मित्र मंडळाचे प्रवक्ते पिंटू देशमुख युवा नेते प्रवीण साळुंखे शिवाजी नाईकवाडी
आमच्या काळात एका एका जिल्ह्याला आठशे कोटी रुपयांचा विमा मिळवून दिला होता परंतु गेल्या वर्षी या सरकार ने पूर्ण ने महाराष्ट्राला सातशे कोटी रुपये विमा मिळवून दिला आहे.आम्ही ज्यांनी विम्याचा हप्ता भरला नाही अशा शेतकऱ्यांना ही पन्नास टक्के रक्कम दिली होती परंतु हे सरकार काहीच करत नसल्याबद्दल शेतकरीवर्गात तीव्र संताप आहे.अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे वीज बिल कापले जात आहे.तर कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे सरकारने हे थांबवावे आणि त्वरित दसऱ्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करावेत नसता शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिला.यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार सुजितसिंह ठाकूर,आमदार अभिमन्यू पवार,आमदार सुरेश धस, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे,मिलिंद पाटील,दत्ता कुलकर्णी आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची सिताफळ संशोधन केंद्रला भेट
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथील विद्यार्थ्यांच्या कृषि संशोधन केंद्रांना भेटी