आळंदी देवाची ता.खेड,पुणे येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी विद्यालयातील कला दालनाच्या उदघाटनप्रसंगी राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी साहेब उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष किरण सरोदे सर व पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष मिलिंद शेलार उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर राज्य उपाध्यक्ष किरण सरोदे यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांच्याशी कला शिक्षक भरती संदर्भात प्रश्न उपस्थित केला त्यावेळी त्यांनी सांगितले की या पुढे कला शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल मार्फत करणार असून कला शिक्षकांची ही TET परीक्षा घेतली जाणार आहे.यापुढे होणाऱ्या TET परीक्षेत कला शिक्षकांचा विचार केला जाणार आहे.
या वेळी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष विनोद इंगोले व राज्य सर चिटणीस प्रल्हाद साळुंके सर यांनी कला शिक्षक भरती संदर्भात तयार करून दिलेले निवेदन राज्य उपाध्यक्ष किरण सरोदे,जिल्हा अध्यक्ष व राज्य सह सरचिटणीस मिलिंद शेलार पुणे जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत नागवडे, हवेली तालुका अध्यक्ष आबा सायकर, खेड तालुका अध्यक्ष दत्तात्रय वंजारी,कलाशिक्षक सोमनाथ बेळे सर यांनी आयुक्त साहेबाना निवेदन देण्यात आले अशी माहिती महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष किरण सरोदे सर यांनी दिली
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर