Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > कविवर्य सुरेश पाठक यांच्या जयंतीनिमित्त ‘एक आठवण…एक कविता’ कार्यक्रमाचे आयोजन

कविवर्य सुरेश पाठक यांच्या जयंतीनिमित्त ‘एक आठवण…एक कविता’ कार्यक्रमाचे आयोजन

मित्राला शेअर करा

बार्शी – येथील कवी कालिदास मंडळाचे संस्थापक व माजी अध्यक्ष कै सुरेश पाठक यांच्या जयंतीनिमित्त कवी कालिदास मंडळाच्या वतीने ‘एक आठवण एक कविता’ या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी दिली.

कविवर्य सुरेश पाठक यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान बहुमोल असे आहे.लगीन लाडुचं, जीवन वाट, कोशिंबीर, मनातल्या मनात हे त्यांचे संग्रह असून राज्यातील अनेक साहित्यिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते कालिदास मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम त्यांनी राबविले त्यांच्या जीवन व साहित्यप्रवासातील आठवणींना उजाळा या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.ज्येष्ठ लेखक प्राचार्य डॉ चंद्रकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वाचनालय,बार्शी येथे रविवार दि 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास साहित्य रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे उपाध्यक्ष जयसिंग राजपूत यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकुंदराज कुलकर्णी, शब्बीर मुलाणी,प्रकाश गव्हाणे,डॉ रविराज फुरडे,गंगाधर अहिरे,दत्ता गोसावी,प्रा अशोक वाघमारे,आबासाहेब घावटे ,सुमन चंद्रशेखर आदी परिश्रम घेत आहेत.

वृक्षसंवर्धन समिती अन् जाणीव फाऊंडेशनच्या परसबाग स्पर्धेतील विजेत्यांचा