फिशिंग हॅकर्स ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे काढतात, अशा अनेक घटना आपल्या आजुबाजुला घडत असतात यावर बँकेकडे यासंदर्भात तक्रार केली तर बँक आपले हात झटकतात.
कोणताही बँक तुमची कोणीही कागदपत्रे, आधार कार्ड नंबर, एटीएम कार्ड नंबर, कार्ड संबंधित इतर माहिती मागत नाही. किंवा व्हेरिफिकेशन साठी कॉल करत नाही. किंवा बक्षिसे देत नाही. टाटा, Amazon अश्या नामांकित कंपन्यांचे एवढेच नव्हे तर पंतप्रधानांचे नाव, फोटो वापरुन तयार केलेल्या फेक वेबसाईट वर बक्षिसांचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते अश्या अनेक फेक लिंक व्हॉट्सअॅप वरती फिरत असतात आणि याला सुशिक्षित लोक सुद्धा बळी पडून लिंक फॉरवर्ड करतात. अश्यावेळी बँकेशी संपर्क करणे उत्तम पर्याय आहे.
तरीही नकळत अशी चूक आपल्याकडून घडून जाते यामध्ये ग्राहकाची चूक आहे असा बँक आरोप करते व आपली जबाबदारी झटकून टाकते दरम्यान राष्ट्रीय ग्राहक आयोगाने अशाच प्रकारच्या एका प्रकरणात बँकेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
HDFC बँकेच्या एका महिलेची क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक झाली होती, या खटल्याची सुनावणी करताना आयोगाने ,कोणत्याही व्यक्तीची हॅकिंग होऊ शकते असे मान्य करत.
बँकेला रक्कम परत करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर ग्राहकांच्या रकमेची संपूर्ण जबाबदारी ही बँकेची असल्याचे म्हणत बँकेला फटकारले आहे
केंद्र सरकारने जुलै 2020 मध्ये, नवीन ग्राहक कायदा आणला आहे त्या अनुषंगाने ग्राहक न्यालयाने हा निकाल दिला आहे.
आपण एक ग्राहक म्हणून आपली कोणत्याही गोष्टीची फसवणूक झाली तर आपण सकाळी ९ ते संध्याकाळी ५ दरम्यान 1800114000 किंवा 14404 या दोन पैकी एका हेल्पलाईन वर कॉल करू शकता
दरम्यान ग्राहक न्यायालयाने बँक फसवणुकीबद्दल दिलेला हा निकाल, तसेची हि माहिती प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाची आहे इतरांना देखील अवश्य शेअर करा.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर