युवराज संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षण सुप्रिम कोर्टाने रद्द केले तसेच इतर काही मुद्द्यांवरून उपोषण सुरू केले आहे.
मराठा आरक्षण रद्द झाल्याने डबेवाल्यांचे सर्वात जास्त वाईट वाटले. कारण डबेवाले मावळ मराठा आहेत. या आरक्षणाचा लाभ डबेवाल्यांना ही होणार होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा यज्ञ मांडला तेव्हा त्या यज्ञांत सर्व प्रथम आहुती आम्ही मावळ्यांनी दिली . स्वराज्याच्या स्थापनेत आम्ही आमचे योगदान दिले. ऐक काळी एका हातात ढाल व एका हातात तलवार घेऊन गड किल्ले चढणारे आम्ही मावळे, काळाच्या ओघात मुंबईत दोन्ही हातात जेवणाचे डबे घेऊन पायर्या आणि दादर चढून डबे पोचवू लागलो. मराठा आरक्षण जाहीर झाले होते या आरक्षणाचा फायदा नक्कीच आमच्या मुलांना होईल असे आम्हाला वाटत होते आमच्या मुलांना शाळा, कॉलेज प्रवेश सुलभतेने मिळेल व प्रवेश शुल्क व फी मध्ये सवलत मिळेल मुले शिकतील पुढे नोकरीत आरक्षण मिळेल नोकऱ्या मिळतील. या आरक्षणाने खर्या अर्थाने मराठा समाजाला विकासांचे नवे दालन खुले झाले होते. पण असे वाटत असताना सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले. त्या मुळे आमच्या सर्व आशा आकांक्षा धुळीस मिळाल्या आहेत अश्या आशयाचे पत्र संघटनेने छत्रपतींना दिले आहे.
मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी युवराज संभाजी छत्रपती २६ फेब्रुवारी पासून आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार आहेत. ” मुंबई डबेवाला असोशिएशन ” समाजासाठीच्या या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाचे शैक्षणिक , सामाजीक व नोकऱ्या मधिल नुकसान कमी व्हावे यासाठी युवराज संभाजी यांनी राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. दि. १७ जून २०२१ रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत राज्य सरकारने या मागण्या मान्य केल्या आहेत. आठ महिने झाले तरी या मागण्यांची आंमलबजावणी झाली नाही . राज्य सरकारने या मागण्यांची तात्काळ आंमलबजावणी करावी , तसेच मराठा आरक्षण मिळवण्यासाठी न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींची आंमलबजावणी करण्यास सुरवात करून लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी आपली मागणी आहे. यासाठी आमरण उपोषण सुरू करत त्याला मुंबई डबेवाला असोशिएशन ” चा जाहीर पाठिंबा आहे असा उल्लेख या पत्रात केला आहे.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर