बार्शी:- येथील हिरकणी ग्रुपच्यावतीने आयोजित विविध स्पर्धात महिलांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करत श्रावण सरी या कार्यक्रमात चांगलाच जल्लोष केला. श्रावण महिना सुरू होताच विविध सण उत्सवांना सुरूवात होते. यानिमीत्ताने स्त्रियांना हौसमोज करायला आवडते. परंतु, धकाधकीच्या जीवनात सण, उत्सवांचा आनंद दुर्मिळ होत चालला आहे. संस्कृतीचा आदर, पारंपारिकतेची जपणूक व्हावी यासाठी जुने व नवीन परंपरा यांची सांगड घालून स्त्रियांना या सणांचा आनंद मिळावा, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या हेतूने येथील हिरकणी ग्रुपच्यावतीने श्रावण सरी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यास महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला.

यावेळी महिलांच्या विविध ग्रुपनी मंगळागौर खेळ सादर केले. महिलांनी यावेळी पारंपारिक वेशभूषा केली होती. स्त्रियांनी घेतलेल्या उखाण्यांनी कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली. सहभागी महिलांनी श्रावण सरी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
प्रारंभी निर्मला बारबोले, प्रमोदिनी कोठारी, डॉ.अमृता बारबोले, अर्चना डिसले-कापसे, डॉ वर्षा शेळके, उषा गव्हाणे, पुनम अंधारे, सुवर्णा बेडके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात वैशाली बारबोले सावळे यांनी स्पर्धा आयोजनाचा हेतू विषद केला. ज्योती लोळगे यांनी प्रमुख पाहुण्यांचा स्वागत सत्कार केला. कार्यक्रमास उषा गव्हाणे, अर्चना डिसले-कापसे, सुवर्णा बेडके, स्वाती देशमुख, मोरे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन शुभांगी जगताप, स्वाती कदम यांनी केले. आभार श्वेता पाटील यांनी मानले. मालती पवार, विदया पाटील यांच्यासह हिरकणी ग्रुपने कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
हिरकणी ग्रुपच्या विविध स्पर्धातील विजेते :
मंगळागौर खेळ : १) श्री संस्कृती ग्रुप, २)बीएनके ग्रुप, ३)सखी ग्रुप
उखाणे : १)सुलभा घुबे, २)मोनाली जाधव, ३)वैष्णवी मुळे
वेशभूषा : १)अमृता खंदाडे, २)किर्ती माने, ३) रेश्मा चेचे
More Stories
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम साहेब यांचे जिल्हा स्तरीय किशोरी मेळाव्यात विविध विषयांवर हितगुज
बाबुरावजी डिसले पुरस्कार २०२४-२५ जाहीर
करमवीर डाॅ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त संत तुकाराम विद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात