पिंपळगाव पांगरी गावातील गट नं 173 या मधील 10 हेक्टर क्षेत्र जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांनी १७११ या फेरफार नुसार वनविभागास वर्ग केली आहे. व राहिलेली २५.९७ आर एवढी जमीन आमच्या चार पिढ्या पासून वहिवाट करत आहोत.
परंतु आम्हास असे समजले आहे की गट नं १७३ मधील संपूर्ण क्षेत्रामध्ये वनविभाग वृक्ष लागवड करणार आहे. तरी हा समस्त गावातील महार समाज्यावर्ती अन्याय होत आहे. असे झाले तर गावातील महार समाजावर उपासमारीची वेळ येणार आहे तरी आपणास विनंती की आपण वनविभागास योग्य तो निर्णय दयावा व आमच्यावरील होणारा अन्याय थांबवावा.
त्याच बरोबर ७५ % मागासवर्गीय समाज आहे. संपूर्ण समाज भूमिहीन होईल सामाज्यावर उपासमारीची वेळ येईल. आम्ही आपणास विनंती करतो की सदर क्षेत्रामध्ये वनविभागास वाढीव क्षेत्रा बाबत चा निर्णयावर योग्य तो विचार करून आमच्यावरील होणारा अन्याय दूर करावा. व २५.९७ आर हे क्षेत्र आम्हाला कायम स्वरूपी देण्यात यावे. असे निवेदनात म्हंटले आहे.
More Stories
महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहने उभा करून माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चालत निघाले