Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने शहरात पाणपोई

जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने शहरात पाणपोई

बार्शीतील जय शिवराय प्रतिष्ठानच्या या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक संस्थेच्या तसेच सहकारीदूत श्री ऋषिकांत पाटील व पाणीदूत श्री बाबासाहेब बारकुल यांच्या सहकार्यातून पाणपोई
मित्राला शेअर करा

साध्य तापमानात प्रचंड वाढ झाली असून उन्हात कोरड्या पडलेल्या घश्याला ओलावा मिळावा म्हणून ज्या ठिकाणी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये येतात व जे नागरिक सहज व सोप्या पद्धतीने पाणी बॉटल घेऊ शकत नाहीत, आशा गरजू नागरिकांसाठी बार्शीतील जय शिवराय प्रतिष्ठानच्या या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक संस्थेच्या तसेच सहकारीदूत श्री ऋषिकांत पाटील व पाणीदूत श्री बाबासाहेब बारकुल यांच्या सहकार्यातून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा जगदाळे मामा हॉस्पिटल येथे पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत.

यामध्ये पाणपोई क्रमांक १ तहसील कार्यालय बार्शी येथे तसेच पाणपोई क्रमांक २ चे लोकार्पण वृक्ष संवर्धन समिती सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जय शिवराय प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.