महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांना, बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीतून वगळलेल्या ४८ गावांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.
बार्शी तालुक्यात मागील १५ दिवसांत सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे. तालुक्यात झालेल्या या अतिवृष्टीमुळे ६ मंडलांमधील गावांमध्ये अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले आहेत.
परंतु अतिवृष्टीच्या निकषातील तांत्रिक अडचणीमुळे तालुक्यातील वैराग, खांडवी, सुर्डी व नारी या मंडलांस अतिवृष्टीतून वगळण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन, संताप व्यक्त होत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र राऊत व अरुण दादा बारबोले यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची आज मंत्रालयात भेट घेतली.
या भेटीदरम्यान, शेतकरी बांधवांच्या या संतप्त भावना व बार्शी तालुक्यातील या ४ मंडलांमधील ४८ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती व वास्तव आमदार राजेंद्र राऊत यांनी, महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासमोर मांडले. या विषयाबाबत आमदार राजेंद्र राऊत यांची. मंत्र्यांबरोबर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाल्यानंतर, संपूर्ण माहितीचे पत्र मंत्र्यांना दिले. यावर तात्काळ निर्णय घेतला असून या संदर्भात जिल्हाधिकारी , सोलापूर यांना याबाबत पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिलेला आहे.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची सिताफळ संशोधन केंद्रला भेट
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान