बार्शी : तालुक्यातील पुनर्वसित महागांव व तांदुळवाडी या गांवच्या प्रलंबित व अपूर्ण नागरी सोयी सुविधांची पूर्तता करण्यासाठी दि. २५ एप्रिल रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात प्रांताधिकारी हेमंत निकम, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार सुनील शेरखाने व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती.

सदर बैठकीत प्रलंबित व अपूर्ण पुनर्वसित सोयी सुविधांची कामे सुरू करण्यासाठी प्रशासकीय व गावपातळीवरील अडचणी सामंजस्यपणे दूर करून त्या कामांना गती देण्यासाठी, बुधवार दि. २७ एप्रिल रोजी संबंधित अधिकाऱ्यांसोबत या पुनर्वसित गावांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे ठरले होते.
त्या अनुषंगाने आ. राजेंद्र राऊत यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार सुनील शेरखाने, भूमापन अधिकारी नरेंद्र झांबरे, लघू पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.एस.शिंदे यांच्या समवेत पुनर्वसित तांदुळवाडी व महागांव या गावांस प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणच्या अपूर्ण व प्रलंबित नागरी सोयी सुविधांची माहिती घेऊन, त्यांची पूर्तता करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक आयोजित करण्याचे ठरले आहे.
या भेटीवेळी तांदुळवाडी व महागांवचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.
More Stories
सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.मुबंईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन
राज्यस्तरीय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धेत बार्शीतील खेळाडूंचे दमदार यश
गोरोबा काकांच्या ७०८ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम