Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > अभिमान बार्शीचा! राष्ट्रीय एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी कॉन्फरन्स, अहमदाबाद येथे बार्शीचे न्यूरोसर्जन डॉ. किशोर गोडगे आमंत्रित

अभिमान बार्शीचा! राष्ट्रीय एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी कॉन्फरन्स, अहमदाबाद येथे बार्शीचे न्यूरोसर्जन डॉ. किशोर गोडगे आमंत्रित

अभिमान बार्शीचा! राष्ट्रीय एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी कॉन्फरन्स, अहमदाबाद येथे बार्शीचे न्यूरोसर्जन डॉ. किशोर गोडगे आमंत्रित
मित्राला शेअर करा

राष्ट्रीय एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी कॉन्फरन्स( मिस्सॅबकॉन 2024 ) अहमदाबाद, गुजरात येथे “प्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून आमंत्रित केल्याबद्दल जगदाळे मामा ट्रॉमा केअर, बार्शीचे न्यूरोसर्जन डॉ. किशोर गोडगे यांचा सन्मान करण्यात आला.

प्रगत दुर्बिणी द्वारे म्हणजेच एंडोस्कोपिक मणक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये डॉ. किशोर गोडगे, बार्शी यांनी त्यांच्या कामाचे सादरीकरण भारतातील न्युरोसर्जनच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात अहमदाबाद, गुजरात येथे सादर केले.

यावेळी देशातील न्यूरोसर्जरी क्षेत्रात काम करणाऱ्या न्यूरोसर्जनच्या मेळाव्यामध्ये सर्वांना न्युरोसर्जन डॉ. किशोर गोडगे मार्गदर्शन केले.

त्यांच्या कार्यामुळे बार्शीचे नाव भारतात गाजत आहे त्यामुळे त्यांच्या या कार्याबद्दल श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव साहेब यांनी जगदाळे मामा हॉस्पिटल रुग्णसेवेत वेगळ्या उंचीवर पोहोचले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली तसेच सर्व संस्था सदस्यांनी संस्थेच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.