पुणे येथील पंचतारांकित कॉनराड होटेल येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ.नवनाथ मल्हारी कसपटे यांना कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे संसदरत्न खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन पुणे टाइम्स मिरर या ग्रुपकडून
करण्यात आले होते.पुणे टाइम्स मिरर ग्रुपच्यावतीने देशातील वेगवेगळ्या क्षेत्रात कामगिरी केलेल्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

यामध्ये बार्शीच्या डॉ.नवनाथ कसपटे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी क्षेत्रात बहुमोलाची कामगीरी करून ‘एनएमके -1 गोल्डन’ हे वाण नावारुपास आणले. त्यामुळे ही कृषी क्षेत्रातील आधुनिक क्रांती मानली गेली.या सीताफळ वानाची लागवड करून आज पर्यंत हजारो शेतकरी लखपती करोडपती झाले आहेत त्यामुळे डॉ.नवनाथ कसपटे यांना कृषी क्षेत्रातील मानाचा एक्सलंट आवार्ड देऊन गौरविण्यात आले.
डॉ.कसपटे यांनी बार्शीतील गोरमाळ्या सारख्या छोट्याश्या गावातून शेती व्यवसायाला सुरवात करून अगदी मोजकी गुंतवणूक,कमी पाणी,प्रगत तंत्रज्ञान याचा पुरेपूर वापर करून शेतीमधून जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल याचे देशासमोर रोल मॉडेल ठेवले.आज त्यांनी निर्माण केलेल्या ‘एनएमके-1 गोल्डन’ या सिताफळाला पेटंट मिळाले असून जागतीक स्तरावर देखील त्याची दखल घेतली आहे.
आज संपूर्ण देशासमोर डॉ.कसपटे यांनी आदर्श उदाहण निर्माण केल्यामुळे बार्शी शहराला सीताफळाची बार्शी अशी ओळख निर्माण झाली असून संबंध देशभरातून कसपटे यांच्या नर्सरीला भेट देण्याऱ्या लोकांची रांग लागली आहे.
यामुळेच डॉ.कसपटे यांना पुणे टाइम्स मिरर ग्रुपकडून कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ