क्रीडा क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणारे शिक्षक,गुरू व जुने नामांकित खेळाडू यांचे क्रिडा क्षेत्रातील योगदान याचा उल्लेख करत विपुल वाघमारे यांनी आपल्या भाषणात आपले महाविद्यालयीन शिक्षण बार्शीत झाले अणि त्यांनी आपल्या कॉलेज जीवनातील काही जुन्या आठवणी सांगितल्या त्याच सोबत ते स्वतः नॅशनल व्हॉलीबॉल खेळाडू असल्यामुळे बरेचदा भगवंत मैदानावर खेळण्याचा प्रसंग आला अणि त्यावेळी या मैदानाची असणारी अवस्था त्यांनी सांगितली.
माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या चार-पाच वर्षांमध्ये दरवर्षी सतत शहराच्या वैभवा मध्ये भर पडेल अशी काम झाली आहेत नगरपालिकांना इतिहास पाहिला तर आपली बार्शी नगरपालिका ही महाराष्ट्रातली एक नामांकित नगरपालिका आहे असे विश्वासभाऊ बारबोले म्हणाले.
माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले यांनी सांगितले की नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या चार-पाच वर्षांमध्ये दरवर्षी सतत शहराच्या वैभवा मध्ये भर पडेल अशी काम झाली आहेत नगरपालिकांचा इतिहास पाहिला तर आपली बार्शी नगरपालिका ही महाराष्ट्रातली एक नामांकित नगरपालिका आहे.
जागतिक कीर्तीची टेनिसपटू जिने क्रीडाक्षेत्रात बार्शीचे नाव जागतिक पातळीवर उज्वल केले बार्शीची कन्या प्रार्थना ठोंबरे हिने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की या कार्यक्रमात सहभागी होताना मी प्राउड फील करत आहे कारण की बार्शी मध्ये येवढ्या मोठ्या प्रेक्षक क्षमतेचे तेवढं स्टेडियम झाले त्यामुळे त्यामुळे नेक्स्ट जनरेशन साठी हे खूप चांगले आहे करिअरमध्ये मी भरपूर प्लेयर्स बघितलेले आहेत आणि आपल्या रुरल भागामध्ये तयार झालेले खेळाडू स्ट्राँग असतात फक्त एक गोष्ट कमी पडते ती म्हणजे फॅसिलिटी छोट्या शहरातून खेळाडू ज्यावेळी मोठ्या स्टेडियमवर खेळण्यासाठी जातात त्यावेळी हजारो प्रेक्षकांच्या समोर सामने होत असतात त्यावेळी ग्रामीण भागातील खेळाडूंचा आत्मविश्वास कमी पडतो या स्टेडियम मुळे ही कमतरता नक्कीच भरून निघणार आहे व पुढील पिढीला हे नक्कीच उपयोगी पडेल
आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या भाषणात सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या इच्छाशक्ती मुळेच आपल्याला सर्व ठिकाणी विजय मिळवता आला
40 पैकी 29 नगरसेवक निवडून आले आणि आपलं समोरच्या पक्षातले सहा नगरसेवकांनी आपल्या मध्ये प्रवेश केला जवळपास निवडून आलेल्या 40 पैकी 35 नगरसेवक आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे करता आली प्रत्येक प्रभागात 6 कोटी ते 15 कोटी रूपयांची विकासकामे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून झाली आहेत आणि भविष्यात ही विकासकामांची घोडदौड सुरू ठेवणार आहोत
या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत भगवंत मैदान येथील शॉपिंग सेंटर भगवंत मैदान स्टेडियम आणि अंतर्गत सहा फ्लड लाईट स्टेडियम परिसर व लक्ष्मी तीर्थ उद्यान येथे दोन्ही बाजूंना 78 गाळे ज्यामुळे तरुणांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे तसेच पुढील तीन महिन्यात नागरिकांना विरंगुळा अणि सर्वांना फिरण्यासाठी गार्डन व चौपाटी निर्माण करतोय ज्यामुळे नागरिकांना मनोरंजनाचा आनंद घेता येईल यामधे लहान मुलांना खेळणी वगैरे उपलब्ध असतिल लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करतो आहे रेकॉर्ड ब्रेक कामे नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केली आहेत आजचा अभिमानाने सांगायला हरकत नाही माझ्याशी भांडून नगरसेवक वॉर्डातील कामे करून घेतात आज प्रत्येक प्रभागांमध्ये कमीत कमी 50 टक्के 75 टक्के व 90 टक्के शंभर टक्के काम पूर्ण झालेली आहेत कोविड परिस्थिती मुळे काम करताना बर्याच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या परंतु या अडचणींवर सुद्धा पर्याय काढत आपण कामे सुरू ठेवली या मध्ये नगरपालिका व इतर अधिकारी वर्गाचे सहकार्य सुद्धा मोठय़ाप्रमाणात लाभले सर्वांच्या आशीर्वादानेच हा सर्व विकास चालू आहे. अणि विकासाची घोडदौड अशीच सुरू रहाणार आहे असे ते म्हणाले.
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या ओळीने सुरवात करत बार्शीकरांसोबत विशेष ऋणानुबंध असणारे.भ.प.प्रकाश बोधले महाराज यांनी आपल्या शीघ्र काव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून आपले आशीर्वाद रुपी मनोगत व्यक्त केले
सोलापूरचे खासदार सिध्देश्वर स्वामी यांनी हिंदी मधून मनोगत व्यक्त केले त्यांनी सुद्धा आपल्या अध्यक्षीय भाषणात या ऐतिहासिक मैदानाचा उपयोग कोणत्या कामासाठी होत होता याची जाणिव करुन दिली याच सोबत आमदार राऊत यांच्या विकासकामांचे कौतुक केले व क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या सर्व खेळाडूनी या स्टेडियमच्या माध्यामातून भावी पिढीला खर्या अर्थाने संस्कारित करण्यासाठी मार्गदर्शन करावे असे आवाहन केले दरम्यान पावसाच्या सरी आल्यानंतर छत्री न घेता भिजत आपले भाषण सुरू ठेवत आदमी को भीगणा चाहिये भागणा नही चाहिये असे मार्मिक वक्तव्य त्यांनी केले. बार्शी शहरात मी 1972 सालापासून येत आलो मध्यंतरी खंड पडला असे सांगत जुन्या आठवणीना उजाळा दिला.
हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर केमिकल टाकून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांचे स्वीय सहायक प्रशांत खराडे यांच्या कर्तव्य दक्षतेने हल्लेखोरांना पकडण्यात यश आले या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये रीतसर गुन्हा दाखल केला आहे.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत