दि . ३०/१२ / २०२१ रोजी दुपारी १२ वा. सुमारास रिक्षाचालक देवीदास हरीचंद्र जाधव रा.पंकजनगर बार्शी हे आपले ऑटोरिक्षामधुन अज्ञात प्रवासी वयोवृध्द व्यक्ती हिरमेठ नाका सुभाष नगर बार्शी ते मार्केट यार्ड बार्शी दरम्यान प्रवास करत असताना प्रवासी वृध्दाकडुन नजरचुकीने ॲटोरिक्षामध्ये विसरलेली ७०,०६० ( सत्तर हजार साठ ) रूपये रोख रक्कम असलेली कापडी पिशवी प्रामाणीकपणे व माणुसकीच्या भावनेतुन बार्शी शहर पोलीस ठाणे येथे हजर केली.
बार्शी शहर पोलीस निरीक्षक श्री. आर. आर. शेळके यांनी टीम पोलीस नाईक, श्रीमंत खराडे व पोलीस कॉन्स्टेबल पृथ्वीराज पवार यांनी त्या अज्ञात वयोवृध्द प्रवाशी व्यक्तीचा शोध घेवुन विसरलेली कापडी पिशवी रोख रक्कमेसह संबधीत वयोवृध्द व्यक्तीस परत करणेबाबत सुचना देवून रवाना केले.
दरम्यान बार्शी शहर पोलीसांनी पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी व ओन्ली समाज सेवा संघ बार्शी यांचे सदस्याचे मदतीने मार्केट यार्ड बार्शी येथे जावुन अज्ञात वयोवृध्द व्यक्तीचा शोध घेतला असता सदरची वयोवृध्द व्यक्ती मार्केट यार्ड बार्शी येथील व्यापारी श्री राजेंद्र साहेबराव पाटील सुभाष नगर बार्शी हे असल्याचे निष्पन्न झाले रिक्षामध्ये विसरलेली एकूण ७०,०६० ( सत्तर हजार साठ ) रूपये रोख रक्कम व कापडी पिशवी यांची बार्शी शहर पोलीस ठाणे येथे ओळख पटवुन खात्री करून सदरची रोख रक्कम श्री राजेंद्र साहेबराव पाटील यांचेकडे श्री. आर. आर. शेळके पोलीस निरीक्षक बार्शी शहर पोलीस ठाणे यांनी रिक्षाचालक देवीदास हरीचंद्र जाधव बार्शी यांचे हस्ते सपुर्द केली.
या कामगीरीमध्ये श्री. आर. आर. शेळके पोलीस निरीक्षक बार्शी शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्रीमंत खराडे, पोलीस कॉन्स्टेबल पृथ्वीराज पवार, पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी तालुका विभाग प्रमुख उमेश आणेराव, तालुका अध्यक्ष पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी राहुल वाणी, बार्शी शहर पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी सदस्य रणजित कोठावळे, विजय माळी यांनी कौतुकास्पद कामगीरी केली.
याबाबत पोलीस निरीक्षक बार्शी शहर
श्री. आर. आर. शेळके यांनी रिक्षाचालक देवीदास हरीचंद्र जाधव, पंकजनगर बार्शी व पोलीस जाणीव सेवा संघाचे कौतुक केले.
रिक्षा चालक देविदास यांच्या प्रामाणिक व निस्वार्थीपणा चे सर्वत्र कौतुक होत आहे.
More Stories
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील