तेर प्रतिनिधी :- धाराशिव तालुक्यातील तेर येथील नृसिंह नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 67 भक्तांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन रक्तदान केले.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया आदिशक्ती आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवा निमित्ताने तेर ता. धाराशिव येथील नृसिंह नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत त्यातच दिनांक 6 रोजी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत 67 भक्तांनी रक्तदान केले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सुजीत इंगळे, अमित कोळपे, मनोज साखरे, सचिन कोळपे, सूरज शिराळ, अविनाश इंगळे, गोपाळ इंगळे, नागेश पांगरकर, गोविंद इंगळे, धीरज पांगरकर, अमोल पांगरकर, रणजीत इंगळे, अक्षय कोळपे , आदिंसह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले
More Stories
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी
जिप उर्दू शाळेतील बाल आनंद मेळाव्यात 90 हजारांची उलाढाल; विविध स्वादिष्ट खाद्य पदार्थांवर विद्यार्थ्यांसह पालकांनी मारला ताव