माहे जानेवारी व फेब्रुवारी २०२२ मध्ये ज्या ब्रम्हवृंदाचे वाढदिवस होते त्या एकूण २८ जनांचे वाढदिवस एकत्रित साजरे करण्यात आले. तसेच भारतरत्न सावरकर यांचे जिवणावर बार्शीचे सावरकर प्रेमी व जेष्ठ अभ्यासक शामसुंदर मुळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे शामसुंदर मुळे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल देशपांडे, सेवानिवृत्त क्रिडा अधिकारी, सोलापुर व माजी नगरसेविका अश्विनीताई बुडूख ह्या होत्या. सदर कार्यक्रमास प्रविण शिरसीकर, महाराष्ट्र प्रदेश संघटक, ‘ ॲडव्होकेट विजय उर्फ पल्लू कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, मिनाताई धर्माधिकारी, पच्छिम महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्ष, ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र राज्य, कैलास बडवे तालुकाध्यक्ष, प्रसाद सहस्त्रबुद्धे, शहराध्यक्ष, विनायक देशपांडे कोषाध्यक्ष, पांडूरंग कुलकर्णी, सहसचिव, मुकुंदशेठ कुलकर्णी निरमावाले, जेष्ठ मार्गदर्शक, वंदना शिरसीकर, तालुकाध्यक्ष महिला आघाडी, ब्राह्मण महासंघ हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन निता देव व आभार प्रदर्शन प्रविण शिरसीकर यांनी केले. सदर कार्यक्रमास बार्शीतील ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने हजर होता.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी