Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > कृषी पुरस्कारासाठी 25 ऑगस्टपर्यंत अर्ज करा कृषी विभागाचे आवाहन

कृषी पुरस्कारासाठी 25 ऑगस्टपर्यंत अर्ज करा कृषी विभागाचे आवाहन

कृषी पुरस्कारासाठी 25 ऑगस्टपर्यंत अर्ज करा कृषी विभागाचे आवाहन
मित्राला शेअर करा

सोलापूर : राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थांना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत पुरस्कार दिले जातात. यावर्षीही इच्छुकांनी कृषी पुरस्कारासाठी 25 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार व कृषी विभागातील अधिकारी /कर्मचारी यांच्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार देण्यात येतात. तसेच सन 2020 पासून राज्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार देण्यात येणार आहे.

पुरस्काराचे वितरण राज्यपाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात. पुरस्कारासाठी कृषी आयुक्तालयस्तरावरून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांनी पुरस्कारासाठीचे प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला 25 ऑगष्ट 2022 पर्यंत सादर करण्याचे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.