दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शंभुराजे प्रतिष्ठान तर्फे शंभूराजे जन्मोत्सव हा थाटामाटात साजरा करण्यात आला. यावर्षी प्रथमच स्वराज्यरक्षक फिजिकल अकॅडमी व शंभुराजे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने पुरंदर ते बार्शी शंभूज्योत आणली गेली . शंभूज्योत घेऊन येण्याची जबाबदारी श्री गणेश जाधव (संस्थापक अध्यक्ष स्वराज्य रक्षक फिजिकल अकॅडमी बार्शी ) व त्यांच्या सर्व मावळ्यांनी यशस्वी पार पाडली.

यावर्षी शंभुराजे प्रतिष्ठानी शंभूराजे जन्मोत्सव निमित्त प्रथमच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा आस्वाद ९०० शंभुराजे भक्तांनी घेतला यावेळी बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे देखील उपस्थित होते.
या शंभूराजे जन्मोत्सव ची सांगता संध्याकाळी भगवंत नगरीतील अत्यंत गाजलेले व लयबध्द असे जय भगवंत ढोल ताशा पथक यांच्या विविध आशा ढोल ताशा च्या सुरांनी झाली. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच बार्शी तालुक्याचे आमदार श्री. राजेंद्र राऊत उपनगराध्यक्ष श्री. कृष्णराज बारबोले माजी नगराध्यक्ष सौ. मंगलाताई शेळवणे, नगरसेवक श्री मदन गव्हाणे होते.
ढोल ताशा पथकाचा कार्यक्रम पाहण्यासाठी शंभूराजे भक्तांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंभुराजे प्रतिष्ठान संयोजन समिती अध्यक्ष मोहित मांजरे, उपाध्यक्ष ऋषिकेश कदम, खजिनदार अमित तपिसे ( गूरव ) तसेच नितीन ( भैय्या ) धस, सागर मोरे, अतुल नलगे, जयेंद्र जाधव, जोतीराम कदम, अनिल जैंद, अमोल पाटील, निलेश मांजरे, महावीर धारीवाल, रोहन जाधव, विनायक चौधरी, सतीश देशपांडे,मानव चव्हाण, विश्वजीत मांजरे,किरण सांगडे, ऋषी देवगावकर, केदार दळवे, पवन जगदाळे, सुशांत वांकर, ऋषीकेश जाधव, अभिषेक कुरुंद, सुमित गुरव, समर्थ भालके, शुभम देशमुख, अनिकेत अर्जुन, अमोल गुंड, चंदन लांडगे, यशराज डोईफोडे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल