भारतीय किसान युनियन या शेतकरी संघटनेचे व शेतकरी आंदोलनाचे प्रमुख नेते राकेश टिकैत यांची भारतीय किसान यूनियन(BKU)मधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
तसेच त्यांचे बंधू नरेश टिकैत यांनाही अध्यक्षपद रिकामे करावे लागले आहे. संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून राजकारणाकडे वळत असल्याने अनेकजण टिकैत यांच्यावर नाराज आहेत.
भारतीय किसान युनियन (अराजकीय) आता मूळ भारतीय किसान युनियनच्या जागी स्थापन करण्यात आली आहे. माझ्याकडे संस्थेचा 33 वर्षांचा इतिहास आहे. 13 महिन्यांच्या आंदोलनानंतर आम्ही घरी आलो तेव्हा आमचे नेते राकेश टिकैत हे राजकारणाने प्रेरित दिसले. आमचे नेते कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या प्रभावाखाली येऊन एका पक्षाचा प्रचार करण्याचे आदेशही देत असल्याचे आपण पाहिले. राजकारण करणे किंवा कोणत्याही पक्षाचे काम करणे हे माझे काम नाही. शेतकऱ्यांचा लढा लढणे हेच माझे काम असेल. मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही.’ असे राजेश सिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भारतीय किसान युनियनशी संबंधित मोठी बातमी येत आहे. येथील शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले राकेश टिकैत यांना बीकेयूमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याचवेळी त्यांचे बंधू नरेश टिकैत यांचीही अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राजेश चौहान यांना अध्यक्ष करण्यात आले आहे.
बीकेयूचे भारतीय किसान युनियन म्हणजेच BKU स्थापना स्वर्गीय चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांनी केली होती त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी, १५ मे रोजी लखनऊ येथील ऊस उत्पादक संस्थेत बीकेयू नेत्यांची एक मोठी बैठक झाली, ज्यामध्ये टिकैत बंधूंविरोधात हा निर्णय घेण्यात आला आहे टिकैत कुटुंबाविरोधात शेतकऱ्यांमध्ये असलेल्या या नाराजीनंतर भारतीय किसान युनियनमध्ये फूट पडली आहे.
बीकेयूचे अनेक सदस्य संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या कारवायांवर नाराज होते. राकेश टिकैत यांनी आपल्या राजकीय वक्तव्यांनी आणि कारवाया तसेच आपल्या अराजकीय संघटनेचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप या शेतकरी नेत्यांनी केला आहे.
टिकैत यांच्या मनमानी कारभारावर शेतकरी संघटनेच्या असंतुष्ट, संतप्त नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने ते मुझफ्फरनगरला परतले.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची सिताफळ संशोधन केंद्रला भेट