नेपाळ विमान अपघातात 16 जण ठार झाल्याची घटना घडली आहे नेपाळमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या तारा एअरलाइनच्या विमानाचे अवशेष मुस्तांग भागातील कोबानमधील डोंगरावर सापडले आहेत. या विमानात मुंबईतील 4 जण होते ते चौघे सध्या बेपत्ता आहेत. या विमानाचा संपर्क तुटला व विमान बेपत्ता असल्याच्या बातम्या काल आल्या होत्या.

नेपाळ लष्कराने बर्फवृष्टीमुळे तारा एअरच्या 9 NAET ट्विन-इंजिन विमानासाठी आणि बचाव कार्य शोधमोहीम थांबवल्यानंतर सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू झाली.
तसेच या दुर्घटनेत आत्तापर्यंत 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित 6 मृतदेहांचा शोध सुरू आहे. हे विमान काल ( दि. 29 ) सकाळी नेपाळमधील पोखरा येथून जोमसोमला जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. दरम्यान, या विमानात 22 प्रवाशांसह मुंबईतील 4 जण होते. ते चौघे सध्या बेपत्ता आहेत.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ