Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कोरोना अपडेट > देशात ओमिक्रॉनचे (Omicron) दोन रुग्ण सापडल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

देशात ओमिक्रॉनचे (Omicron) दोन रुग्ण सापडल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

मित्राला शेअर करा

आफ्रिका येथून कर्नाटकात आलेले दोन रुग्णांपैकी दोन पाँझिटीव्ह रुग्ण आढळून आले होते या पैकी 1 हा 11 तारखेला तर दुसरा 20 नोव्हेंबरला भारतात आला होता. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती व आफ्रिकेतून आले असल्यामुळे त्यांची ओमिक्रॉन चणीची करण्यात आली या चाचणीचा अहवाल येण्यास सध्या विलंब लागत असल्याने त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले होते

या दोन रुग्णांचा ओमिक्रॉनचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यातलाच एक रुग्ण हा 64 वर्षाच आहे तर दुसरा रुग्ण हा 44 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे दोन्ही रुग्ण हे पुरुष आहेत आणि चाळीस वर्षाच्या पुढं आहेत. काल रात्री या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरीएंट आहे आणि आफ्रिका तसच युरोपमध्ये ह्या नव्या व्हेरीएंटनं धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टापेक्षा कित्येक पट घातक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली आहे.

बंम्बीनो गेसु रुग्णालयाने प्रकाशित केलेला ओमिक्रॉन व्हेरीएंटचा फोटो

गेल्या एक महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये रुग्ण संख्या जास्त आहे. 49 टक्के लोकांना कोरोना दिल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्या कमी झाल्याचं दिसून आल्याचं केंद्राचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. तसेच जगातील 29 देशात ओमिक्रॉनचा फैलाव झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात देखील आफ्रिकेतून आलेले 9 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत मात्र त्यांचे अहवाल अद्याप समोर आले नाहीत दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा हाहाकार ही चर्चाज गभरात सुरूआहे. दक्षिण आफ्रिकेतल्या बहुतांश प्रांतात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडतायत. त्यामुळेच महाराष्ट्रासह देशभरात आफ्रिकेतून आलेल्या आणि येणाऱ्यांवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे. फक्त दक्षिण आफ्रिकाच नाही तर इतर देशात सुद्धा ओमिक्रॉनचे रुग्ण वाढतायत.