नवी दिल्ली | भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराचं दिल्लीत वितरण पार पडलं आहे. भारतीय सिनेमातील आजीवन योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो.
यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार साऊथचे मेगास्टार शिवाजीराव गायकवाड अर्थातच रजनीकांत यांना देण्यात आला आहे. यासोबतच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून मनोज वाजपेयी आणि साऊथचा स्टार धनूष यांना देण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पंगा आणि मणिकर्णिका चित्रपटातील भूमिकेसाठी कंगणा राणावतला देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दिवगंत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या छिछोरे चित्रपटला मिळाला आहे.
उत्कृष्ट बालचित्रपट कस्तुरी या चित्रपटाचे दिग्दर्शक बार्शीचे सुपुत्र विनोद कांबळे यांचा उत्कृष्ट बालचित्रपट दिग्दर्शक म्हणून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विज्ञान भवन नवी दिल्ली येथे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
आज देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते नवी दिल्लीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) – मनोज वाजपेयी (भोसले), धनुष (असूरन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना राणावत (पंगा, मणिकर्णिका)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- छिछोरे
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजय सेतुपती (सुपर डिलक्स)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) – सोहिनी चट्टोपाध्याय
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – बी. प्राक (तेरी मिट्टी- केसरी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – सावनी रविंद्र रान पेटलं
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- महर्षी नर्गिस दत्त
बेस्ट फिचर फिल्म पुरस्कार – ताजमाल
सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट – कस्तूरी (मराठी)
सर्वोत्कृष्ट छायांकन – जल्लीकट्टू (मल्याळम)
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी येथे चर्मकार समाज वधूवर सुचक मेळावा संपन्न