Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > दहावी बारावी बोर्ड परीक्षेची फी परीक्षार्थीना वापस मिळणार

दहावी बारावी बोर्ड परीक्षेची फी परीक्षार्थीना वापस मिळणार

मित्राला शेअर करा

सन २०२१ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ( इ . १२ वी ) साठी नोंदणीकृत विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतावा करण्याबाबत करण्याबाबतचे प्रकटन प्रसिद्ध केले आहे.

यानुसार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे – ४११००४ . – प्रकटन क्र.रा.मं. / लेखा- ६/६५३२ , दिनांक ११/११/२०२१ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे मार्फत सन २०२१ मधील इ . १० वी व इ . १२ वी च्या मुख्य परीक्षा शासन निर्णयानुसार ( कोविड १ ९ च्या प्रादुर्भावामूळे ) रद्द करण्यात आली .

मा . उच्च न्यायालय , मुंबई यांच्या आदेशानुसार मंडळाने सन २०२१ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा ( इ .१० वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ( इ . १२ वी ) चे परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा अंशत : करण्यात येत आहे अशी माहिती बोर्डाने दिली आहे.

यासाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांचा तपशील दिनांक १२ / ११ / २०२१ रोजी सकाळी ११.०० पासून मंडळाचे


१ ) इ . १० वी व १२ वी साठी


mahahsscboard.in


२ ) इ . १० वी साठी

https://feerefund.mh-ssc.ac.in


३ ) इ . १२ वी साठी

https://feerefund.mh-hsc.ac.in


या संकेतस्थळावरून / लिंकव्दारे नोंदविणे आवश्यक आहे . सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी याबाबत नोंद घ्यावी अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी दिली आहे.