धाराशिव, दि.१०:- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानूसार आज १० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात निवडणूकविषयक गठीत विविध समित्यांच्या प्रमुखांनी निवडणूकविषयक काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव, धाराशिवच्या तहसीलदार मृणाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विषयनिहाय प्रशिक्षण देण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांनी आचारसंहिता या विषयावर, तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी नामनिर्देशन व अनुषंगिक बाबी यावर,जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे यांनी उमेदवार खर्च सनियंत्रण या विषयावर,मांजरा प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले यांनी टपाली व ईटिपीएस मतदान याविषयी, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मीडिया कक्ष तसेच माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण विषयक यावर आणि जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे यांनी आयटी ॲप्लिकेशन यावर सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना तसेच विविध समित्यांच्या अधिकारी-कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी