Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > फॅक्ट चेक > ड्रॉइंग परीक्षेसंदर्भातील त्या व्हायरल वृत्तपत्र कात्रणा विषयी कला शिक्षक महासंघांचा खुलासा

ड्रॉइंग परीक्षेसंदर्भातील त्या व्हायरल वृत्तपत्र कात्रणा विषयी कला शिक्षक महासंघांचा खुलासा

मित्राला शेअर करा

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासकीय रेखाकला परीक्षा म्हणजेच एलिमेंट्री व इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात यासाठी कला संचालनालय तसेच मंत्रालय पातळीवर देखील पाठपुरावा केला होता. परिणामी या परीक्षा ऑनलाईन स्वरुपात घेण्याच्या दृष्टीने संचालनालयाने सकारात्मकता दाखवत त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

परंतु एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांबाबत एका इंग्रजी दैनिकातून दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे. सदर कातळावर कोणत्याही दैनिकाचे नाव दिसत नाही. यात असे म्हटले आहे की एलिमेंटरी इंटरमिजिएट या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात ऑफलाईन होतील. तसे गव्हर्मेंट ने पत्र काढले आहे. यावर कला शिक्षक महासंघाचे प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद साळुंखे यांनी कला संचालनालय येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून याची सत्यता पडताळणी केली.

त्यावर कला संचालनालयाकडून स्पष्ट स्वरुपात असे सांगितले की असे आम्ही कोणतेही परिपत्रक काढलेले नाही. एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षा ऑनलाइनच होणार. शासनाच्या परिपत्रका शिवाय कोणीही कोणत्याही बातमीवर, विश्वास ठेवू नये. असे सांगण्यात आले आहे. त्यांनी असे सांगितले की संचालनालय मुंबई यांच्याशी चर्चा केली आहे व सर्वांना एकच विनंती की या परीक्षा आता ऑनलाईनच होणार आहेत.

तसेच ज्या केंद्र संचालकांना 2019 चे प्रमाणपत्र एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षांचे मिळाले असतील. परंतु त्याच्यावर स्पेलिंग मिस्टेक नावात चुका झालेल्या असतील. त्या चुकांबाबत नेमका डीडी किती रुपयांचा काढावा? याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट सांगितले की, केंद्र संचालकांकडून नावे अतिशय बरोबर आलेली असतील त्यांच्या कडे त्याचा पुरावा असेल तो सादर करावा त्यांना कोणतीही फी लागणार नाही. परंतु केंद्र संचालकांकडून चूक झालेली असेल त्यामुळे प्रमाणपत्र चुकीच्या नावाने आले असेल तर अशावेळी एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षांचे प्रमाणपत्र दुरुस्तीसाठी माननीय कला संचालक कला संचालनालय मुंबई या नावाने फक्त पन्नास रुपयांचा डीडी काढावा लागेल. त्यासोबत ओरिजनल प्रमाणपत्र, त्या मुलाचे बोनाफाईड हे रजिस्टर पोस्टाने पाठवले तरी चालेल. किंवा जास्त विद्यार्थी असतील तर व्यक्तिगत स्वतः आले तरीही चालेल. कला संचालनालय यांचेकडून स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल किंवा प्रिंटींग मिस्टेक झालेली असेल तर कोणताही डी.डी काढायची आवश्यकता नाही. तरी सर्व कलाशिक्षक बांधव व शाळांनी यांनी याची नोंद घ्यावी.

तसेच जे विद्यार्थी एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. त्यांचे शालेय पोर्टलला शासनाचे ॲप जोडलेले असेल त्यामुळे विद्यार्थी त्याचा आधार नंबर किंवा जन्मतारीख किंवा नाव हे जेव्हा टाकेल तेव्हा शालेय पोर्टल मधील संपूर्ण माहिती त्याच्यासमोर अपडेट होईल. म्हणून या पुढील नावांमध्ये चुकांचा प्रश्न येणार नाही. शालेय पोर्टल मध्ये त्याचे नाव जसे असेल तसे ते धरण्यात येईल.

इतर ज्या गोष्टी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघला कला संचालनालयाकडून प्रत्यक्ष कळवल्या जातील या संदर्भात सर्व माहिती कला शिक्षकांना देण्यात येईल असे ते म्हणाले तसेच बऱ्याच कला शिक्षकांच्या समस्यांना उत्तर देण्यासाठी गुगल मीट द्वारे कला शिक्षक बांधवांसाठी मीटिंग घेण्यात आली. अनेकांच्या शंकांचे चांगल्या पद्धतीने निरसन केले आहे.

महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय विनोद इंगोले यांनी सुरेख भाषेत मार्गदर्शन केले आहे. प्रदेश सरचिटणीस म्हणून साळुंखे यांनी शंकांचे निरसन केले

ही फक्त कला संचालनालय यांची परीक्षा नाही तर ती आपल्या सर्वांची आहे असे समजून आपण सर्वांनी एकमेकांना मदत करून विद्यार्थी हितार्थ कला विषयी हितार्थ या परीक्षा यशस्वी करण्यासाठी वाटचाल करूया असे आवाहन महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद साळुंखे यांनी केले आहे.