Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कसा कराल अर्ज

प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कसा कराल अर्ज

मित्राला शेअर करा

आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येईल तसेच आता किसान क्रेडिट कार्ड फक्त शेतीपुरते मर्यादित राहणार नाही त्याचे इतर फायदे सुद्धा आहेत.

तर पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांना देखील या अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल तसेच कर्जावरील व्याजासाठी सरकारकडून 2% सबसिडी मिळेल असे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.

कुणाला मिळेल कार्ड – शेती, मत्स्यपालन आणि पशुपालन करणारी व्यक्तीला याचा लाभ मिळणार याचा लाभ घेण्यासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल 75 वर्षे आवश्यक आहे

असे मिळेल कार्ड अर्जाची प्रक्रिया यासाठी सर्वप्रथम

pmkisan.gov.in

या साईटवर जा किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड करा हा फॉर्म जमिनीची कागदपत्रे तसेच पिकांच्या तपशीलांसह भरा नंतर अर्ज सबमिट करा त्यानंतर आपल्याला बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल

आवश्यक कागदपत्रे – किसान क्रेडिट कार्डसाठी आपल्याकडे वोटर ID card/ PAN कार्ड/ पासपोर्ट/आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळणार, हि माहिती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे शेतकरी मित्रांना देखील अवश्य शेअर करा