Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > मनोरंजन > राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन

राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन

मित्राला शेअर करा

६१ व्या  महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या कलावंतांकडून कलाकृती मागविण्यात येत आहेत.

या प्रदर्शनात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी रु.५०,०००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) याप्रमाणे एकूण १५ पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक कलावंतांनी अर्ज करण्यासाठी दि. ०५ ते १५ जानेवारी, २०२२ असून
या कालावधीत कला संचालनालयाच्या

http://bit.ly/3JNqUX8

या लिंकवर ऑनलाईन स्वरुपात कलाकृती सादर कराव्यात, असे आवाहन कला संचालनालयाचे, प्र. कला संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.