Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > भैरवनाथ शिक्षण संस्थेत स्काउट गाईडची स्थापना

भैरवनाथ शिक्षण संस्थेत स्काउट गाईडची स्थापना

भैरवनाथ शिक्षण संस्थेत स्काउट गाईडची स्थापना
मित्राला शेअर करा

बार्शी : वृक्षदिनाचे औचित्य साधून भैरवनाथ शिक्षण संस्था बार्शी संचलित श्री संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या शाळेत स्काउट गाईड ची स्थापना करत एक नवीन उपक्रम सुरु करण्यात आला

वृक्षदिनाच्या निमीत्ताने शाळेत आज शाळेच्या वतीने स्काउट गाईड च्या माध्यमातुन वृक्षा रोपन करण्यात आले. या वृक्षारोपनाच्या माध्यमातुन स्काउट गाईड चे शिक्षक व विद्यार्थ्यी नवनवीन उपक्रम राबवतील यासाठी शाळेचे शिक्षक राजु अखंडेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली निहाल शेख, सुजाता आंधळे, गणेश कदम, राजश्री निंबाळकर, शुभांगी नखाते अशी सर्व शिक्षक व माध्यमिक शिक्षक,कर्मचारी मेहनत घेत आहे. यासाठी शाळेचे संस्थापक मा. श्री संतोष गुळमिरे यांचे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभते असे शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती मुंढे यांनी सांगीतले.