रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री, श्री. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली येथे बैठक संपन्न झाली. महाराष्ट्रातून जाणार्या हरित महामार्गासंबंधी नाशिक व नगरच्या शेतकरी शिष्टमंडळाने आपल्या समस्या मांडल्या व लेखी पत्रक दिले.
मागील काही दिवसापूर्वी सूरत चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मिळणार्या अत्यल्प मोबदल्या मुळे शेतकरी संतप्त आहेत व मोबदला स्विकारायला तयार नाहीत आणि अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. या अनुषंगाने शेतकर्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या होत्या व या भेटीत श्री. पवार यांनी गडकरी यांची भेट घेऊन शेतकर्यांच्या मागण्या श्री. यांच्या समोर मांडण्याचे आश्वासन शेतकर्यांना दिले होते.
याप्रसंगी शरद पवार यांच्यासह, माजी मंत्री आमदार श्री. प्राजक्त तनपुरे, नाशिक शहर जिल्हाध्यक्ष श्री. गजानन शेलार, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. कोंडाजी मामा, उत्तर महाराष्ट्र विभागीय युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलक व शेतकरी शिष्टमंडळ उपस्थित होते.
काल झालेल्या या भेटीमुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून शेतकर्यांच्या हिताचा तोडगा निघतो का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
More Stories
पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ
निवडणूक यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे निर्देश