हरी खोटे-तेर
उस्मानाबाद .जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा,मांजरासह जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला. उस्मानाबाद तालुक्याची जलदायिनी असलेल्या तेरणा नदीला मोठा महापूर आला.
त्यामुळे या नदीवरील तेर गावाला पाण्याने वेढा घातला. शेकडो घरामध्ये पाणी आल्याने घरातील वस्तू पाण्यात चिंब होवून गेल्या.पाणी ओसरल्याने घरातील वस्तू सुकविण्यासाठी लोकांची तळमळ सुरु आहे.तेर येथील पाणी ओसरल्याने कोरडा झालेल्या रस्त्यावर विद्यार्थ्यांनी आपापली भिजलेली शैक्षणिक कागदपत्रे सुकण्यासाठी रस्त्यावर अंथरली.
या अतिवृष्टीने शेतकरी,शेतमजूरासह नागरिकांचे अतोनात नुकसान तर झाले आहेच परंतू भविष्याची मदत ठरणारे शैक्षणिक कागदपत्र पाण्याने भिजल्याने हजारो विद्यार्थ्यांचे भविष्यच रस्त्यावर आल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे.
More Stories
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल तारीख
व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान