Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > फॅक्ट चेक > सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपीला सेशन कोर्ट बार्शी यांनी सुनावली शिक्षा

सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपीला सेशन कोर्ट बार्शी यांनी सुनावली शिक्षा

सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपीला सेशन कोर्ट बार्शी यांनी सुनावली शिक्षा
मित्राला शेअर करा

दिनांक 27/2/2019 रोजी टेंभुर्णी येथील कुईवाडी चौक येथे टेंभुर्णी पोलीस ठाणे कडील पोलीस नाईक राजेंद्र ठोंबरे, बाळराजे घाडगे, सिध्देश्वर कोडलिंगे असे ट्रॅफीक केसेस करीत असताना दुपारी 1-20 वा.चे सुमारास अशोक लेल्यांड कंपनीचे पीकअप वाहन क.एम.एच.45/ए.एफ.3222 चा. चालक मोबाईल फोन कानाला लावुन बोलत वाहन चालवित असताना दिसला. त्याला पोना ठोंबरे यांनी थांबण्याचा इशारा केला असता त्याने त्याचे वाहन न थांबवता पुढे पुढे आणु लागला म्हणुन ठोंबरे यांनी पोलीस कोडलिंगे यांना आवाज देवुन मदतीसाठी बोलावले. त्या दोघांनी सदर वाहन चालकास रोडचे कडेला वाहन उभा करणेस सांगुन त्याने वाहन थांबविलेनंतर वाहन चालविण्याचा परवाना तसेच गाडीचे कागदपत्रे मागीतले असता चालकाने देण्यास नकार दिला व वाहनातुन मोठमोठ्या आवाजात ठोंबरे यांना तु आम्हाला का विचारतो ? तुझे जिवावर आम्ही वाहन घेतो का तुम्हास कागदपत्रे दाखवायचे काय कारण आम्ही पंचवीस वर्षे झाले हेच करतो आम्हाला पोलीसांना कुठे कसे गाठायचे हे चांगले माहीत आहे. असे म्हणुन पोलिसांना आरेरावीचा भाषा करून म्हणाला की, माझा टेम्पो इथेच सोडुन जातो. तुम्हाला न्यायचे तिकडे न्या असे मोठमोठ्याने बोलुन पोलिसांना आर्वाच्य भाषेत शिवीगाळी करू लागला. पोना ठोंबरे हे चलन पावती लिहीत असताना त्यांना धक्का मारून ढकलुन देऊन सरकारी कामात अडथळा केला.

आरोपी शंकर मच्छिंद्र नवगिरे रा माळेगाव ता माढा याचे विरुद्ध पोलीस नाईक राजेंद्र ठोंबरे यांनी टेंभूर्णी पोलीस ठाणेस गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भोसले यांनी करुन आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून मा.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हा शाबितीसाठी 4 साक्षीदार तपासण्यात आले.

यातील फिर्यादी व साक्षीदार यांची साक्ष, तसेच तपासी अंमलदार यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे सरकारी वकिल श्रीमती राजश्री कदम यांनी मा न्यायालयासमोर मांडले.

सरकारी पक्षाचा पुरावा याचा विचार करता मा.जिल्हा न्यायाधीश श्री. एल एस चव्हाण साहेब यांनी आरोपी शंकर मच्छिंद्र नवगिरे रा माळेगाव ता माढा यांना कोर्टाने दोषी ठरवून भा.द.वि. कलम 353 अन्वये 8 दिवसाचा कारवास व 5000/- रुपये दंड, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110,117 अन्वये 1200/- रुपये दंड, मोटार वाहन कायदा कलम 250,177 अन्वये 500/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

सरकार पक्षा तर्फे श्रीमती राजश्री कदम यांनी काम पाहीले. तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी साक्षीदारांना योग्य मार्गदर्शन करून वेळोवेळी कोर्टात हजर ठेवले.

सदर केसमध्ये मा. श्री अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा व मा. श्री दिपक पाटील पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस ठाणे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.