हॅट्रिक बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडवी मुली शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल तिसऱ्या वर्षीही 100% लागला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी परीक्षेत खांडवी मुलीच्या शाळेतील सर्व विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
शाळेने सलग तीन वर्ष शिष्यवृत्ती परीक्षेत 100% यश मिळवल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मुजावर मॅडम यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती संकपाळ मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
या सर्व विद्यार्थिनींना श्री. मिरगणे सर,श्री. ताकभाते सर ,श्रीसातपुते सर,श्री जाधव सर,श्रीमती गावडे मॅडम,श्रीमती पाटील मॅडम यांचेही मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.रमेश बारंगुळे,केंद्रप्रमुख श्रीमती गिलबिले मॅडम,गटशिक्षणाधिकारी श्री.एल.एस.जाधव साहेब यांनी हार्दिक अभिनंदन केले.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर