आजपर्यंत रिक्षा मध्ये आपण साउंड सिस्टीम बसवलेली पाहत आलो आहोत परंतु या रिक्षा मधील सुविधा पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा अश्चर्यचकीत होणार कारण चेन्नई येथील अन्ना दुराई यांच्या रिक्षात Wifi, टीव्ही, छोटासा फ्रीज, लॅपटॉप आणि टॅबलेट, मॅगझिन, वृत्तपत्र अशा वस्तू आहेत. एवढंच नाही, तर कोरोना काळात हँड सॅनिटायझर आणि मास्कही ठेवण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व हाय-क्लास सोयी-सुविधांसाठी ते कोणताही अतिरिक्त चार्ज घेत नाहीत. बेटर इंडियाने अन्ना यांची रिक्षा आणि त्यांच्या आयुष्यावर एक व्हिडीओ बनवला आहे. ते चेन्नईत अतिशय प्रसिद्ध असून अतिशय सुंदर इंग्रजीही बोलतात.
आनंद महिंद्रा यांनी या हटके काम करणाऱ्या एक व्यक्तीसाठी केलेलं ट्विट (Anand Mahindra Tweet) चर्चेत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एका ऑटो रिक्षा ड्रायव्हरला मॅनेजमेंटचा प्रोफेसर अशी उपमा दिली आहे. त्यापुढे त्यांनी थेट महिंद्रा इलेक्ट्रिकच्या CEO ला या ऑटो ड्रायव्हरकडून काही शिकण्याचा सल्ला दिला आहे. सदर रिक्षा ड्रायवर संदर्भातील हा व्हिडीओ बेटर इंडियाने पोस्ट केला आहे. चेन्नईतील एक ऑटो ड्रायव्हर अन्ना दुराई (Anna Durai) व्हिडीओ ट्विट केला होता. यात अन्ना यांच्या अनोख्या मॅनेजमेंट स्किलबाबत सांगण्यात आलं होतं. आनंद महिंद्रा यांनी याच ट्विटवरुन अन्ना यांना मॅनेजमेंट प्रोफेसर असं म्हटलं आहे. ‘जर एमबीएच्या विद्यार्थ्यांनी या ड्रायव्हरसोबत एक दिवस घालवला, तर ते Customer Experience Management कम्प्रेस्ड कोर्ससारखंच होईल. हा व्यक्ती केवळ ऑटो ड्रायव्हर नसून मॅनेजमेंटचा प्रोफेसर आहे’ अशा आशयाचं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.
त्यांनी केवळ अन्ना यांच्याबद्दल कौतुकास्पद ट्विटच केलं नाही, तर त्यांच्या महिंद्रा इलेक्ट्रिकचे (Mahindra Electric) CEO सुमन मिश्रा यांना टॅग करत, यांच्याकडून काही शिकण्याचा सल्लाही दिला आहे.
More Stories
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
डिसेंबर अखेरपर्यंत शिवस्मारकाचा लोकार्पण सोहळा होणार – आमदार राजेंद्र राऊत
ओन्ली समाज सेवा बहूउद्देशीय संस्था बार्शी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ सोहळा उत्साहात संपन्न