श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित कर्मवीर हिंदी अध्यापक संघ, बार्शी च्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन हिंदी भाषण प्रतियोगिता आयोजित केली होती या स्पर्धेत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अहमदनगर, जळगाव, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद इत्यादी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घेतला होता एकूण 163 स्पर्धक सहभागी झाले होते प्राथमिक स्तर माध्यमिक स्तर व महाविद्यालयीन स्तर असे तीन गट केले होते त्या गटानुसार भाषण प्रतियोगीताचे विविध विषय पुढील प्रमाणे होते.
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी चे अध्यक्ष मा. श्री डॉ. बी वाय यादव साहेबांनी प्रत्येक विजेत्या स्पर्धकाला ( ‘खाली जमीन वर आकाश’ लेखक डॉ. सुनीलकुमार लवटे ) एक पुस्तक देऊन सन्मानित केले.
वरील स्पर्धेतून विजेता विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा व हिंदी दिवस 17 सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती ग्रंथालय श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी प्रो. डॉ. अर्जुन चव्हाण ( अनुवादक, आलोचक, व पूर्व अध्यक्ष हिंदी विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. जयकुमार शितोळे (चेअरमन, सांस्कृतिक विभाग श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ , बार्शी ) प्रमुख उपस्थिती मा. श्री. पी. टी. पाटील ( सचिव, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी ) मा . श्री. डॉ. बी. वाय. यादव ( अध्यक्ष श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी ) मा. श्री. नंदकुमार जगदाळे ( उपाध्यक्ष, श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ , बार्शी ) मा.श्री. अरूण देबडवार ( सहसचिव, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी ) मा. श्रीम. नसीमबानू मुजावर ( विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग, पंचायत समिती बार्शी ) मा. प्राचार्य दीपक गुंड ( शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय, बार्शी ) मा. प्राचार्य चव्हाण सर ( महाराष्ट्र विद्यालय, बार्शी ) प्रो. जाधव सर ( श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी ) मा. श्री शेळके सर ( मुख्याध्यापक l, किसान कामगार विद्यालय ठोंगे ) मा. श्रीम. विद्यागर मॅडम व विविध विद्यालय, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, मार्गदर्शक व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी श्री शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाचे विद्यार्थी व महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे विद्यार्थी यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याचबरोबर पुरस्कार विजेते विद्यार्थी परिवारासोबत उपस्थित राहून सोहळा द्विगुणीत केला तसेच प्रा. किरण गाढवे सरांचे मोलाचे सहकार्य मिळाले. हिंदी केवळ कार्यालय, शालेय मर्यादित न राहता प्रत्येक क्षेत्रात उपयोग व्हावा प्रमुख पाहुण्यांची अपेक्षा व सामारोहाचे अध्यक्ष मा.श्री. जयकुमार शितोळे सरांनी हिंदी भाषेचे महत्व सांगितले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा प्रमुख श्री चव्हाण सर ( किसान कामगार विद्यालय, ठोंगे ) प्रमुख अतिथीचा परिचय प्रा. वैद्य सर ( श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी ) कार्यक्रमाचे आभार श्री चौधरी सर ( कर्मवीर विद्यालय, चारे ) व सूत्रसंचालन श्री महाले सर ( वखारिया विद्यालय, उपळे दुमाला ) यांनी केले व राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद