HSC RESULT बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी 8 जून, लागणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल व विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध असेल. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यावर आपल्याला निकाल पाहता येईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ऑफलाइन घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याची संभाव्य आठवडा जाहीर करण्यात आला होता.

या परीक्षेस १४,८५,१९१ विद्यार्थी प्रविष्ट झाले. यापैकी ८,१७,१८८ मुलं असून मुलींची संख्या ६,६८,००३ एवढी आहे.
अखेर 8 जून रोजी हा निकाल लागेल, असं स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी यापूर्वीच दिली होती. निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं. राज्यातील बारावीच्या सर्व विद्यार्थी पालकांचं हे बारावीच्या निकालाच्या लक्ष लागलेलं होतं. विद्यार्थ्यांची (HSC result live) निकाल पहाण्याची उत्सुकता वाढली होती कारण यावर्षी परीक्षा ऑफलाइन झालेल्या आहेत अणि अखेर बुधवारी दुपारी हा निकाल (Maharashtra HSC Results 2022 )
जाहीर केला जाणार आहे.
खालील लिंकवर क्लिक करून आपला निकाल पाहू शकाल
http://www.hscresult.mkcl.org/
https://hsc.mahresults.org.in/
https://marathi.abplive.com/exam-results/maharashtra-board-hsc-result-62989a9d0c3e4.html
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले