तेर प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असलेल्या तेर ता उस्मानाबाद येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १७ जागेसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत सोमवार दिनांक ६ जून रोजी महसुलचे प्राधीकृत आधिकारी व तेरचे मंडळ आधिकारी अनील तिर्थकर , ग्रामविकास आधिकारी प्रशांत नाईकवाडी , तलाठी प्रशांत देशमुख यांच्यासह लोकप्रतिनिधी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत १७ जागेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली
विशेष म्हणजे सरपंचपद आरक्षित असलेल्या व सर्वाधिक मतदार असलेल्या प्रभागात अनु.जमातीच्या महिला साठी एकही जागा आरक्षण सोडतीत आरक्षित नसल्याने सरपंच पदांचीस्वप्ने उराशी बाळगत गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या कार्यकर्त्याचा हिरमोड झाला आहे ६ प्रभागातून १७ सदस्य निवडून द्यावयाचे असून ९ जागा महिला साठी राखीव आहेत तर सरपंचपद हे अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव असून या प्रवर्गासाठी सर्वाधिक मतदार असलेल्या प्रभागात एकही जागा सोडतीत निघाली नसल्याने दुसऱ्या प्रभागातील जागेवर अनुसूचित जमातीच्या महिला निवडून आणून सरपंच करण्याचे आव्हान राजकीय पक्षासमोर आहे
प्रभाग क्र.१ सर्वसाधारण महिला १ व २ सर्वसाधारण , प्रभाग क्र.२ सर्वसाधारण महिला २ जागा व सर्वसाधारण पुरूष १ , प्रभाग क्र.३ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण महिला प्रत्येकी एक जागा, प्रभाग क्र. ४ सर्वसाधारण महिला दोन जागा व सर्वसाधारण एक जागा,
प्रभाग क्र.५ अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण या प्रभागात दोनच जागा आहेत, प्रभाग क्र ६ मध्ये अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण महिला व पुरुष प्रत्येकी एक जागा आहे विशेष म्हणजे ६ प्रभागातून १७ जागांमध्ये ९ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे आगामी काळात तेर ग्रामपंचायतींवर महिला राज पाहायला मिळणार आहे
विशेष म्हणजे सोमवारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १७ जागेसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत असल्याने आगामी काळात सरपंच पदासह सदस्य पदांची स्वप्ने पाहणारे लोकप्रतिनिधी कार्यकर्तेची आपल्या प्रभागात कुठले आरक्षण निघते यांसाठी उत्सुकता शिगेला पोहोचली होती परंतु आरक्षण जाहीर झाल्यानंतर आपल्या प्रभागात अपेक्षित आरक्षण निघाले नसल्याने अनेक लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला विशेष म्हणजे ६ ही प्रभागात जागा १ परंतु इच्छूकांची संख्या जास्त अशी परिस्थिती उद्भवणार असल्याने सरपंच पदासह सदस्य पदांचे तिकीट कोणाला द्यायचे यासाठी पक्षश्रेष्ठींचा कस लागणार असून आपल्या सरपंच पदासह सदस्य पदांचे तिकीट मिळावे यासाठी आतापासूनच इच्छूकाकडून तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे
HSC RESULT पहा बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन आपल्या मोबाईलवर, खालील लिंकवर क्लिक करा
https://kranti-news.in/hsc-result-online/
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर