Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > सूरत चेन्नई ट्रम्पेट रद्द झाल्यास वैराग भागाचे होईल मोठे नुकसान

सूरत चेन्नई ट्रम्पेट रद्द झाल्यास वैराग भागाचे होईल मोठे नुकसान

ट्रम्पेट रद्द झाल्यास वैराग भागाचे होईल मोठे नुकसान
मित्राला शेअर करा

ज्या गावांमध्ये दळणवळणाची सुविधा सक्षमपणे उभी असते त्या गावांचा विकास झपाट्याने होतो आणि व्यवसायाच्या संधीही वाढतात. आता वैराग भागाला देखील सुरत चेन्नई महामार्गावरील ट्रम्पेटच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध झाली आहे मात्र काही शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे जर हे ट्रम्पेट रद्द झाले तर वैराग भागाचे मोठे नुकसान होणार आहे.

बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या वैराग भागाच्या विकासाला महामार्गाच्या म ध्यमातून विकासाच्या संधी उपलब्ध होत आहेत. सुरत -चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे हा बार्शी तालुक्यातील पहिलाच महामार्ग असून, तालुक्यातील पहिले ट्रम्पेट वैरागम ध्ये प्रस्तावित आहे. या ट्रम्पेटचा फायदा तालुक्यासही होणार आहे. या ट्रम्पेटमुळे वैराग उस्मानाबाद आणि बार्शी-सोलापूर या दोन्ही राज्यमार्गावरून सुरत चेन्नई एक्सप्रेस वे वरती जाता किंवा येता येणार आहे. विशेष म्हणजे प्रस्तावित नागपूर- गोवा एक्सप्रेस वे देखील अगदी जवळून जाणार असल्यामुळे दोन महामार्गाचा मोठा फायदा वैरागसह माढा, मोहोळ, तुळजापूर भागांना होणार आहे. त्यामुळे स्थानिकांसह प्रशासनाने आपल्या भूमिकेमध्ये बदल करून विकासाला प्राधान्य देत गती वाढवणे महत्त्वाचे बनले आहे.

सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे ची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे कर्नाटकात तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून धाराशिव अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात ही भूसंपादन प्रगतीपथावर आहे. सोलापूर जिल्ह्यात वैराग, अलीपुर रोड, केगाव, तांदुळवाडी, हसापूर अशा पाच ठिकाणी ट्रम्पेट प्रस्तावित वाढणार आहे. मात्र स्थानिकांनी विरोध केल्यास या महामार्गाचा लाभ त्यांना घेता येणार नाही

याशिवाय ट्रम्पेट रद्द झाल्यास आहे त्यामुळे आपोआपच भागातील कधीही न भरून येणारे नुकसान या भागाचे होणार असून विकासाची गती देखील खुंटणार आहे. या महामार्गावरून दररोज तीन ते चार हजार वाहने प्रवास करणार असल्यामुळे ट्रम्पेटच्या ठिकाणी स्थानिकांना व्यवसाय – करण्याची संधी मिळणार असून उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे यासह शेतकऱ्यांना आपल्या मालासाठी लांब पल्ल्याच्या बाजारपेठा जवळ येणार आहेत.


ट्रम्पेट म्हणजे काय:
एक्स्प्रेस वेवर प्रवेश करण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी केलेली व्यवस्था म्हणजे ट्रम्पेट. मराठी ‘फ’ आकारात रस्ते गोलकार फिरवून अत्यंत सहज आणि विनाअपघात हे क्रॉसिंग पूर्ण व्हावे, अशी सोय केलेली असते. पूर्वीचा मुख्य रस्ता किंवा महामार्ग यावर उड्डाणपूल बांधून मूळची वाहतूक सुरळीत ठेवत एक्सप्रेसवेवर या रस्त्यावरून ये-जा करता येते. एक्सप्रेस वे वरती जाण्यासाठी ट्रम्पेट हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे जर हा मार्ग बंद झाला तर भविष्यात त्या भागाची मोठी हानी होणार आहे.

अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी भूसंपादन


अनेक ठिकाणच्या भूसंपादन प्रक्रिया पार पडले असून ट्रम्पेट साठीच्या नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आल्या आहेत. केवळ शेत जमिनीच्या मूल्याबाबत स्थानिकांचा विरोध होत असून याबाबत शेतकऱ्यांसह प्रशासनाने लवचिक भूमिका घेऊन मार्ग काढणे महत्त्वाचे आहे.