Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > बार्शीत नवचेतना मैत्री फेस्टिव्हललचे दिमाखदार उद्घाटन, लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनीच्या वतीने उपक्रम

बार्शीत नवचेतना मैत्री फेस्टिव्हललचे दिमाखदार उद्घाटन, लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनीच्या वतीने उपक्रम

बार्शीत नवचेतना मैत्री फेस्टिव्हललचे दिमाखदार उद्घाटन, लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनीच्या वतीने उपक्रम
मित्राला शेअर करा

बार्शी – : लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनीचया वतीनेआयोजित नवचेतना मैत्री फेस्टिव्हलचे दिमाखदार उ‌द्घाटन डिस्ट्रीक गवर्नर एमजेएफ ला . ॲlएम के पाटिल तसेच वूमन एम्पॉवरमेंट डिस्ट्रिक्ट चेअरमन MJF ला. चेतना होमकर व लायन्सबार्शी टाऊन चे अध्यक्ष ला. महावीर कदम यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले .

या क्लबच्या माध्यमातून  बचपन ते पचपन जी कन्सेप्ट राबवली आहे. त्याचबरोबर बार्शीतालुक्यातील महिलांसाठी  व्यासपीठ उपलब्ध होत आहे.  महिलांच्या छोट्या कलागुणांना वाव  मिळत आहे असे  कौतुक  MJF ला. चेतना होमकर यांनी केले व  फेस्टीवल साठी शुभेच्छा दिल्या.

महिलांमध्ये सुप्त गुण असतात व या गुणांना वाव मिळाल्यास त्या आपल्या जीवनाचे सार्थक करू शकतात त्यासाठी बार्शीतील लायन्स क्लब बार्शी टाउन तेजस्विनी या क्लब ने नवचेतना मैत्री फेस्टिवल आयोजित केले आहे असे प्रकल्प प्रमुख ला . शर्वरी फुरडे म्हणाल्या .

हे मैत्री फेस्टिव्हल २१ व २२ सप्टेंबर रोजी लिंगायत बोर्डिंग येथे दोन दिवस होत आहे. यामध्ये कलश डेकोरेशन , सोलो व ग्रुप डान्स , पणती डेकोरेशन , वडिलांच्या वाढदिवसानिमित्त ग्रीटिंग कार्ड बनवणे , तसेच आगळीवेगळी स्पर्धा म्हणून लहान बाळाचे रांगणे , हेल्दी स्माईल स्पर्धा व सासु सुनांमध्ये तूतू – मेमे स्पर्धा अशा विविध १५ स्पर्धा होणार आहेत विविध प्रकारचे शॉपिंग स्टॉल व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असणार आहेत.
हा कार्यक्रम मुली व महिलांसाठी सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत सुरू आहे .सर्व बार्शीकर महिलांनी याचा आनंद घ्यावा असे आव्हान अध्यक्ष विद्या काळे व तेजस्विनी सदस्यांनी केले आहे.

या उद्घाटनासाठी डिस्ट्रीक सीओ. ला. गंगाप्रसाद बंडेवार , चिपळून येथील ला. संतोष होमकर , लिओ अध्यक्ष गौरव देढिया लायन्स क्लब बार्शी टाऊन , तेजस्विनी व लिओ टाऊन चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

या कार्यासाठी लायन्स तेजस्वीनी चे अध्यक्ष ला विद्या काळे , सचिवा ला प्राची जमदाडे , खजिनदार ला कविता अंधारे , ला शर्वरी फुरडे , ला योगीता कटारीया , ला वैशाली शहा , ला पल्लवी बजाज यांनी परिश्रम घेतले आहे

सूत्रसंचालन जयश्री ढगे व सोनाली कसपटे यांनी केले .प्राची जमदाडे यांनी आभार प्रदर्शनाने केली.